महिलांसाठी कायदेविषयक व आरोग्यविषयक शिबिर
By Admin | Updated: March 16, 2017 00:43 IST2017-03-16T00:43:29+5:302017-03-16T00:43:29+5:30
अल्पसंख्याक विकास मंचच्या वतिने स्थानिक राजीव गांधी महाविद्यालय मुल रोड चंद्रपूर येथे महिलांसाठी कायदेविषयक व आरोग्यविषयक शिबिर सोमवारला घेण्यात आले.

महिलांसाठी कायदेविषयक व आरोग्यविषयक शिबिर
महिलांचा सत्कार : अल्पसंख्यक विकास मंचचे आयोजन
चंद्रपूर : अल्पसंख्याक विकास मंचच्या वतिने स्थानिक राजीव गांधी महाविद्यालय मुल रोड चंद्रपूर येथे महिलांसाठी कायदेविषयक व आरोग्यविषयक शिबिर सोमवारला घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मतीन शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित जि.प.सदस्य देवराव भोंगळे मार्गदर्शक म्हणून स्त्री आधार केंद्राच्या संचालिका अँड. विजया बांगडे, स्त्रिरोग तज्ज्ञ पल्लवी इंगळे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मतीन शेख, व प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून समाजासमोर सक्षमीकरणाचा आदर्श ठेवणाऱ्या ठेवलेल्या बचत गटाच्या साडी, श्रिफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अंजली पवार तर आभार ज्योत्सना खोंड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल पवार, अफरोज पठाण, नसीब चौधरी, चंद्रशेखर काळे, हनिफ भाई, रमेश अण्णा पुजा शाहु आदींनी प्रयत्न केले. (नगर प्रतिनिधी)