हृदय रोगावर व्याख्यान

By Admin | Updated: May 31, 2015 01:57 IST2015-05-31T01:57:14+5:302015-05-31T01:57:14+5:30

पंजाबी समाज सेवा समितीच्या वतीने नुकतेच पंजाबी समाज सेवा समितीच्या हॉलमध्ये माधवबाग येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे हृदय रोगावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

Lecture on heart disease | हृदय रोगावर व्याख्यान

हृदय रोगावर व्याख्यान

चंद्रपूर : पंजाबी समाज सेवा समितीच्या वतीने नुकतेच पंजाबी समाज सेवा समितीच्या हॉलमध्ये माधवबाग येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे हृदय रोगावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानाने पंजाबी समाज सेवा समितीच्या बहुतांश बांधवांनी लाभ घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माधवबाग येथील तज्ज्ञ डॉ. प्रमोद चव्हाण, पंजाबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष पी.एम. साहनी (कुक्कु), नगरसेवक अंजली घोटेकर, समितीचे कोषाध्यक्ष विनोद कत्याल, सचिव सुरेश शर्मा, उपाध्यक्ष नरेश अनेजा यांची उपस्थिती होती.
सर्वात प्रथम मनपा नगरसेवक अंजली घोटेकर यांचे समितीचे उपाध्यक्ष नरेश अनेजा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात शित शवपेट्यांचे नगरवासीयांसाठी लोकार्पण करण्यात आले. पंजाबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष पी.एम. साहनी आपल्या संबोधनपर भाषणात म्हणाले, समितीच्या वतीने समाजासाठी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याचा एक भाग म्हणून हृदय रोगावर व्याख्यान तथा शित शवपेट्यांचे पाहुण्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यापूर्वी रक्तदान, नेत्र चिकित्सा-मोतीबिंदुचे आॅपरेशनसारखे कार्यक्रम घेण्यात आले. या अंतर्गत गरीब तसेच होतकरू विद्यार्थ्यांना समितीच्या वतीने दत्तक घेऊन त्यांचे दायित्व स्विकारण्यात येईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवबाग येथील डॉ. प्रमोद चव्हाण होते. त्यांनी आपल्या भाषणात हृदय रोगावर विस्तृत माहिती दिली. नगरसेवक अंजली घोटेकर म्हणाल्या, पंजाबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष पी.एम. साहनी यांनी एका वर्षापासून लोकोपयोगी कार्य केलेले आहे. समितीचे सचिव सुरेश शर्मा यांनी प्रास्ताविक केले. पंजाबी समाज सेवा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात अध्यक्ष पी.एम. साहनी, सहसचिव गौरव खोसला, रवी कत्याल यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे, प्रीती सरबेरे, संघमित्र बुटके तथा मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व संचालन सुरेश शर्मा यांनी केले. आभार कुक्कु साहनी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Lecture on heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.