शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

चिमूरची मेघा देतेय देशभरात नेतृत्वाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:30 PM

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर क्रांतिभूमीत जन्म घेतलेली पिटीचुवा या लहानशा खेड्याशी नाळ असलेली मेघा सुरेश रामगुंडे ही ओजस्वी वक्तृत्व कलेच्या जोरावर देशपातळीवर युवक - युवतींना नेतृत्व गुणांविषयी मार्गदर्शन करीत आहे. तिला ब्रिक्स युवा अ‍ॅम्बेसिडरचा बहुमान मिळाला आहे.पिटीचुवा येथील सुरेश रामगुंडे यांची मेघा या मुलीचा जन्म चिमूर येथे झाला. मात्र ...

ठळक मुद्देब्रिक्स युवा अ‍ॅम्बेसिडरचा मान : ओजस्वी वक्तृत्वाने राष्ट्रीय स्तरावर ठसा

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर क्रांतिभूमीत जन्म घेतलेली पिटीचुवा या लहानशा खेड्याशी नाळ असलेली मेघा सुरेश रामगुंडे ही ओजस्वी वक्तृत्व कलेच्या जोरावर देशपातळीवर युवक - युवतींना नेतृत्व गुणांविषयी मार्गदर्शन करीत आहे. तिला ब्रिक्स युवा अ‍ॅम्बेसिडरचा बहुमान मिळाला आहे.पिटीचुवा येथील सुरेश रामगुंडे यांची मेघा या मुलीचा जन्म चिमूर येथे झाला. मात्र शिक्षण बल्लारपूर येथे झाले. बि.एस्सीनंतर एलएलबीचे शिक्षण पुण्यात घेतले.पदवी वर्षातच तिने विविध वादविवाद स्पर्धांतून वक्तृत्व शैलीचे पैलू दिले. पुणे येथील एमआयटीमध्ये पंधरा हजार विद्यार्थ्यांमधून युवा वक्ता मेघाची निवड करण्यात आली. महिला आरक्षण या विषयावर ओजस्वी व परखड मते मांडून तिने अनेकांची मने जिंकली. त्यामुळे ब्रिक्स या आंंतरराष्ट्रीय संघटनेने दिल्लीत घेतलेल्या युवा समीटमध्ये युवा वक्ता व युवा राजदूत म्हणून मेघाची निवड केली.ब्रिक्सच्या माध्यमातून तिला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले. भारतातील विविध राज्यांमधील युवक - युवतींमध्ये जागृती करण्याचे काम ती सध्या करीत आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेवर तिचे प्रभृत्व आहे. देश पातळीवर युवकांकरिता काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था विज्ञान वेद फाऊंडशेनची निर्मिती करून संचालिका आणि वक्ता म्हणून देशातील विविध राज्यांत समाजसेवेचे कार्य करीत आहे. मेघाच्या वक्तृत्वाचा आलेख उंचावत असून, हे चिमूर तालुका व जिल्ह्यासाठी भूषणावह आहे.