शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

पट्टेदार वाघ व पशुपालक आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:46 IST

चंद्रपूर वीज केंद्राच्या हिराई अतिथीगृहाच्या पाठीमागील जंगल परिसरात शेळ्यांकरिता झाडांची पाने तोडणारा इसम व तिथेच असलेला पट्टेदार वाघ आमने सामने आले. मात्र प्रसंगावधान व हिम्मत दाखवून त्याने वाघाला चांगलीच हुलकावणी दिली. यामुळे तो थोडक्यात बचावला.

ठळक मुद्देथोडक्यात बचावला : मोठ्या हिमतीने वाघाला दिली हुलकावणी

लोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर : चंद्रपूर वीज केंद्राच्या हिराई अतिथीगृहाच्या पाठीमागील जंगल परिसरात शेळ्यांकरिता झाडांची पाने तोडणारा इसम व तिथेच असलेला पट्टेदार वाघ आमने सामने आले. मात्र प्रसंगावधान व हिम्मत दाखवून त्याने वाघाला चांगलीच हुलकावणी दिली. यामुळे तो थोडक्यात बचावला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.किरर्र जंगल, निर्जन स्थळ आणि त्यात एकटाच असलेला मनुष्य व त्याच्यापुढे हल्ल्याच्या बेतात उभा असलेला पट्टेदार वाघ अशी स्थिती आज हिराई अतिथी गृहाच्या पाठीमागील जंगल परिसरात निर्माण झाली होती. खैरगाव येथील राम कुबेर बन्सीलाल यादव हा इमस त्या जंगल परिसरात शेळ्यांकरिता झाडांची पाने आणण्याकरिता गेला होता. या परिसरात दाट जंगल असून पाणी पिण्याची सोय असल्याने वाघ तिथे आश्रयास होता. सदर इसम पाने तोडत असताना झुडपात बसलेला वाघ त्या इसमाच्या अगदी दोन ते तीन मीटर अंतरावर उभा झाला. राम यादव यांच्या हल्ला करण्यासाठी संधीची वाट बघत त्याच्याकडे सारखा पाहत होता. मात्र त्याने मोठ्या धैर्याने आपली कुऱ्हाड वर उचलून जोरजोराने आरडाओरड करीत एक-एक पाऊल मागे सरकविणे सुरू केले. दरम्यान हिराई अतिथीगृहाचे कर्मचारी भिंतीवर उभे राहून आरडाओरड करीत वाघाला पळविण्याचा प्रयत्न करीत होते. अशातच राम यादव याने पटकन सुरक्षा भिंतीवरून आत उडी घेतली. त्यामुळे तो थोडक्यात बचावला.वीज केंद्राच्या जंगल परिसरात तीन ते चार पट्टेदार वाघाचे वास्तव्य आहे. सलग दोन दिवसात झालेल्या दोन घटनेने वीज कर्मचाऱ्यात कमालीची दहशत पसरली अहे. सदर घटनेची माहिती चंद्रपूर वनविभागाला देण्यात आली. तेथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, विभागीय वन अधिकारी व कर्मचाºयाचा ताफा दाखल झाला होता. वनविभागाने घटनास्थळी ठिकठिकाणी कॅमेरे लावले आहेत.वाकल- मोहाळी रस्त्यावर वाघाचे दर्शनवासेरा : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील लहान बालक (स्वराज) याला बिबट्याने झोपेतून नेऊन ठार केले. नंतर चार दिवसांनी गडबोरी येथील गयाबाई या वृद्ध महिलेला घरातूनच उचलून ठार मारले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी गडबोरी जवळील मुरमाडी येथील इसम नदीपात्रात जनावरांना पाणी पिण्यास नेले असता वाघाने, झडप घेऊन ठार केले. ही घटना ताजी असतानाच त्याच परिसरात दोन किमी अंतरावरील वाकल येथील सरिता बंडू मांदाळे ही आज शुक्रवारी सकाळी ८ वाजता वाकल जवळील नदी शेजारी शेतावर भाजीपाला आणण्याकरिता गेली असता शेताशेजारी वाघाचे दर्शन झाले.शेतात वाघ दिसताच सरिताने रस्त्याच्या कडेला आरडाओरड केली. नंतर वाघ तिथून पळ काढून निघून गेला. ही वार्ता वाकल, मोहाळी गावात वाºयासारखी पसरली व स्वत: सरिता ही स्वगावी दोन किमी अंतरावर आली व झालेला प्रकार सांगितला. तेव्हा वाकल येथील महिला, पुरुष शेताकडे गेले. तेव्हा वाघ नव्हता. मोहाळी येथे याबाबतची माहिती होताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वन कर्मचारी वनमजूर त्या ठिकाणी गेले. परंतु वाघ दिसला नाही.मुरमाडी येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला, त्याच परिसरातील वाघ असावा, अंदाज ग्रामस्थ सांगतात. मुरमाडी येथील गुराखी ठार हा नदीपात्रात झाला. त्या स्थळापासून हे शेत दोन किमी अंतरावर असून वाघाचा वावर त्याच परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.बोथलीत वाघीणमागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक गावपरिसरात वाघ, बिबट, अस्वल यांचे दर्शन होऊ लागले आहे. शिकार व पाण्याच्या शोधात हे हिंस्र प्राणी गावशिवारात येत आहेत. सावली तालुक्यातील सावली उपवनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बोथलीजवळच्या जंगलात दोन बछड्यासह एका वाघिणीचे वास्तव्य आहे. वनविभागाने लावलेल्या कॅमेºयात या वाघिणीच्या हालचाली कैद झाल्या आहेत. मात्र वाघिणीचे नेमके लोकेशन सांगण्यात वनविभागाने नकार दिला आहे.

टॅग्स :Tigerवाघ