एलसीबीची दुसऱ्यांदा रेतीघाटावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:59+5:302020-12-13T04:40:59+5:30

ट्रॅक्टरमालक व चालकाला अटक : साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर : घुग्घुस येथील चिचोली नदी पात्रात स्थानिक गुन्हे शाखेच्या ...

LCB's second foray into the sand dunes | एलसीबीची दुसऱ्यांदा रेतीघाटावर धाड

एलसीबीची दुसऱ्यांदा रेतीघाटावर धाड

ट्रॅक्टरमालक व चालकाला अटक : साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर : घुग्घुस येथील चिचोली नदी पात्रात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री धाड टाकून एक ट्रॅक्टरसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी ट्रॅक्टरमालक जुनैद उर्फ शावर रजा सिद्धीकी, (२४), चालक नितीन प्रकाश घोडके (४८) दोघेही रा. घुग्घुस याना ताब्यात घेतले आहे. रेतीघाटावर धाड टाकून कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेची ही आठवड्यातील दुसरी कारवाई आहे. घुग्घुस चिचोली नदीपात्रातून रेतीची मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री रेतीघाटावर धाड टाकली. यावेळी रेतीघाटावर एमएच ३३ ओएफ १३८९, ट्राली क्रमांक एमएच ३३ जि. ३३३० मध्ये रेती आढळून आली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करुन ट्रॅक्टरचालक व मालकाला अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, संजय आतकुलवार, महेंद्र भुजाडे, अमजद खान, चंदु नागरे, अविनाश दाखमवार, कुंदनसिंग बावरी, प्रशांत नागोसे, नितीन रायपुरे आदींनी केली.

Web Title: LCB's second foray into the sand dunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.