एलसीबीचे दोन ठिकाणी धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:16+5:302021-04-22T04:29:16+5:30
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात दोन ठिकाणी कारवाई करून ३० लाखांचा ...

एलसीबीचे दोन ठिकाणी धाडसत्र
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात दोन ठिकाणी कारवाई करून ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आकाश बबन सुकलंकर २३, जगदीश नरेश विजयनगरम २५, दोघेही रा. हिंगणघाट, अजय वामन हजारे ४२, रा. मित्रनगर या तिघांना अटक केली आहे.
भद्रावती-चंद्रपूर हायवे मार्गावरील एमआयडीसी, ताडाळी चौक परिसरात दारू तस्करी होत असल्याच्या माहितीवरून छापा टाकला. यावेळी एमएच ३१ बीसी ६८१० क्रमांकाच्या चारचाकी वाहनांची तपासणी केली असता ७१ पेट्या देशी, विदेशी दारूसाठा आढळून आला. यावेळी दारूसाठा आणि वाहन असा सुमारे १९ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी अजय हजारे याला अटक करून बंडू आंबटकर वय ३७, रा. समुद्रपूर यावर गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या कारवाईत नेरी-मोटेगाव मार्गावर कारवाई करून एमएच १४ एफएम २४७२ क्रमांकाच्या वाहनातून २४ पेट्या विदेशी दारूसह १० लाख ४५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आकाश सुकलंकर, जगदीश विजयनगरम, अवी नावरखेले, नितीन नावरखेडे, रा. हिंगणघाट यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.