धोकादायक पुलाला कठडे लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST2021-01-14T04:23:22+5:302021-01-14T04:23:22+5:30

वाहनांमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ वरोरा : वाहनांवर कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ...

Lay the dangerous bridge | धोकादायक पुलाला कठडे लावा

धोकादायक पुलाला कठडे लावा

वाहनांमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ

वरोरा : वाहनांवर कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाईची तरतूद करण्यात आली असताना, या निणर्याची अंमलबजावणी होत नाही. याकडे पोलीस विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.

गोंदिया, वर्धासाठी रेल्वे सुरू करावी

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे काही रेल्वेसेवा अद्यापही बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गोंदिया, तसेच वर्धा येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांना बस, तसेच खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. परिणामी, आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे पॅसेंजर सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अवैध वाहतुकीला निर्बंध घालावा

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक मार्गांवर अवैध वाहतुकीला ऊत आला असून, याकडे मात्र परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवाशी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना सतत घडत असून, यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. याकडे वाहतूक विभाग, तसेच परिवहन विभागाने लक्ष ठेवून अवैध वाहतुकीवर निर्बंध आणण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Lay the dangerous bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.