गुप्तधन काढण्याच्या नावाखाली ४५ हजाराचा लावला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST2021-03-08T04:26:50+5:302021-03-08T04:26:50+5:30

अजय जोधा पडियाल (४५), सागर अजय पडियाल (२७) दोन्ही रा. इंदिरानगर चंद्रपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. गोंडसवारी येथील ...

Lavala of Rs 45,000 in the name of extracting secret money | गुप्तधन काढण्याच्या नावाखाली ४५ हजाराचा लावला चुना

गुप्तधन काढण्याच्या नावाखाली ४५ हजाराचा लावला चुना

अजय जोधा पडियाल (४५), सागर अजय पडियाल (२७) दोन्ही रा. इंदिरानगर चंद्रपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.

गोंडसवारी येथील रवींद्र यादव पेंदोर याला गुप्तधन काढून देतो. त्यासाठी पूजा करावी लागेल. पूजेसाठी २ लाख ५० हजार रुपये लागतील असे सांगून ॲडव्हान्स म्हणून अजय व सागर यांनी ४५ हजार रुपये घेतले. उर्वरित दोन लाख रुपयांसाठी त्यांनी पेंदोर यांच्याकडे तगादा लावला. याबाबतची तक्रार स्थानिक गुन्हे शाखेकडे करताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप काकडे यांनी एक पथक तयार करून सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यावेळी अजय व सागर यांची चौकशी केली असता त्यांनी गुप्तधन काढण्यासाठी पैसे घेतले असल्याचे कबूल केले. त्यामुळे मूल पोलीस स्टेशनमध्ये कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंद करून त्यांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापळे, सुरेश केमेकर, गणेश भोयर, प्रदीप मडावी, गणेश मोहुर्ले, संजय वाढइ, गोपीनाथ नरोटे, मयूर येरणे आदींनी केली.

Web Title: Lavala of Rs 45,000 in the name of extracting secret money