बामणी येथे ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST2021-03-14T04:25:35+5:302021-03-14T04:25:35+5:30

बल्लारपूर : बामणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ओंकार ग्रामसंघ अमित नगरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरवात करण्यात ...

Launch of Rural Livelihood Campaign at Bamani | बामणी येथे ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात

बामणी येथे ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात

बल्लारपूर : बामणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ओंकार ग्रामसंघ अमित नगरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरवात करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य ॲड. हरीश गेडाम, बामणी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष ताजने, ग्राम विकास अधिकारी लक्ष्मण शेंडे उपस्थित होते. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचा उद्देश हा आहे की तळागाळातील गरिबांसाठी मजबूत अशा संस्थांची बांधणी करून त्याद्वारे लाभदायक स्वयंरोजगार व कुशल वेतनी रोजगाराची संधी मिळविणे गरीब कुटुंबांना शक्य व्हावे व त्याद्वारे दारिद्र्य कमी करणे आहे. बचत गटांच्या माध्यमातून उमेद मार्फत ही यंत्रणा राबविली जाईल.

कार्यक्रमात ओंकार ग्राम संघाच्या पल्लवी मेश्राम, नंदाताई पेंदोर, स्नेहल साळवे, शकुंतला मोटघरे, अश्विनी शिंदे यांची उपस्थिती होती. संचालन शकुंतला मोटघरे यांनी केले. आभार प्रदर्शन लक्ष्मण शेंडे यांनी केले.

Web Title: Launch of Rural Livelihood Campaign at Bamani