सावलीत कोविशील्ड लसीकरण मोहिमेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:26 IST2021-03-06T04:26:55+5:302021-03-06T04:26:55+5:30
मागील महिन्यापासूनच कोविशील्ड लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग व फ्रंटलाईन वर्कर अशा एकूण ८०८ कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा लाभ ...

सावलीत कोविशील्ड लसीकरण मोहिमेला प्रारंभ
मागील महिन्यापासूनच कोविशील्ड लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग व फ्रंटलाईन वर्कर अशा एकूण ८०८ कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. ४५ वर्षांवरील नागरिक ज्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड तसेच यकृता संदर्भात आजारी असलेले, कर्करोगग्रस्त सिकलसेल ग्रस्त, एचआयव्ही बाधित तसेच आरोग्य विभागाने प्रमाणित केलेले इतर आजार असलेल्या व्यक्तींना सुद्धा या लसीकरणाचा लाभ घेता येईल. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. सदर नोंदणी ही मोफत असून संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करून लसीकरण दिनांक व केंद्राची निवड करता येईल. त्यासाठी मोबाईल क्रमांक आधार किंवा विहित ओळखपत्र ज्यावर ओळखपत्र क्रमांक असेल ते ऑनलाईन नोंदणीच्या वेळी सादर करायचे आहे. तरी ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
कोट
कोविशील्ड लसीकरणाचे दोन डोस घ्यायचे असून पहिल्या डोसच्या २८ दिवसानंतर दुसरा डोस दिल्या जाईल. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या लसीकरणाचा लाभ घेऊन कोरोना महामारीला हरवण्याकरिता मदत करावी.
-डॉ. अनिकेत गेडाम, नोडल ऑफिसर तालुका कोविड लसीकरण,ग्रामीण रुग्णालय सावली.