स्व. राजीव गांधी स्वावलंबन कर्ज योजेनेचा आज शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST2020-12-12T04:43:52+5:302020-12-12T04:43:52+5:30
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या स्व. राजीव गांधी स्वावलंबन कर्ज योजनेचा शुभारंभ मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री ...

स्व. राजीव गांधी स्वावलंबन कर्ज योजेनेचा आज शुभारंभ
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या स्व. राजीव गांधी स्वावलंबन कर्ज योजनेचा शुभारंभ मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते त्यांच्या जन्मदिनी शनिवार दि. १२ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गरजू व छोट्या व्यावसायिकांना थेट कर्ज पुरवठा करण्यासंदर्भात बॅंकेमार्फत कर्ज धोरण करण्याचे पालमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांना सुचविले होते. त्यादृष्टीने कर्ज धोरण तयार करुन जिल्ह्यातील शेतकरी बांधवाच्या भाजीपाला व छोट्या व्यवसायाकरिता जमिनदाराची अट न घालता व कोणतेही तारण न ठेवता ५० हजार रुपयांपर्यंत थेट कर्ज वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी केले आहे.