कै.राजधरदादा कारंजेकर पुरस्कार प्रदान सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:52+5:302021-03-19T04:26:52+5:30
सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील सामाजिक कार्यकर्ते व महानुभाव पंथीय विचारांचे प्रचारक व प्रसारक रमेश गणवीर (कै. ...

कै.राजधरदादा कारंजेकर पुरस्कार प्रदान सोहळा
सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील सामाजिक कार्यकर्ते व महानुभाव पंथीय विचारांचे प्रचारक व प्रसारक रमेश गणवीर (कै. राजधरदादा कारंजेकर) यांचे प्रथम स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण तथा व्याख्यानमालेचा कार्यक्रम आनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी कै. राजधरदादा कारंजेकर सेवा समितीचे अध्यक्ष दीपक गणवीर, सचिव नीता रामटेके, विलास रामटेके, ज्ञानेश्वर हेमने, संतोष रामटेके तसेच विदर्भातील अनेक मंडळी आनलाइन स्वरूपात सहभागी झाले होते. यावर्षी कै. राजधरदादा कारंजेकर स्मृती पुरस्कार महानुभाव तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्रा. किशोर शेंडे व महानुभाव विचारांचे प्रसारक मधुकरदादा उर्फ महंत अळजापूरकर बाबा यांना प्रसिद्ध साहित्यिक, कवी तसेच सामाजिक कार्यकर्ते ॲड. भुपेश वामनराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.