देशी कट्टा बाळगणाऱ्या लखमापुरातील व्यावसायिकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:28 IST2021-09-03T04:28:49+5:302021-09-03T04:28:49+5:30
चंद्रपूर शहरानजीक लखमापूर येथील छत्तीसगड झोपडपट्टीमधील एका व्यावसायिकाच्या दुकानात देशी कट्टा लपवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. ...

देशी कट्टा बाळगणाऱ्या लखमापुरातील व्यावसायिकाला अटक
चंद्रपूर शहरानजीक लखमापूर येथील छत्तीसगड झोपडपट्टीमधील एका व्यावसायिकाच्या दुकानात देशी कट्टा लपवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री आरोपी रूकधन परसराम साहू याच्या दुकानावर छापा टाकला असता देशी कट्टा व देशी बनावटीचे पाच जिवंत काडतुसे आढळली. आरोपीविरुद्ध रामनगर ठाण्यात भारतीय हत्यार कायदा ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली. ही कारवाई ठाणेदार खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक बोबडे, संदीप कापडे, संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, प्रांजल झिलपे, कुंदन बावरी आदींनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.