शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

पराभवाच्या भीतीने आणली लाडकी बहीण योजना : विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 13:18 IST

Chandrapur : व्याहाड (बूज), अंतरगाव, पाथरी येथे प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्क सावली : राज्यात फडणवीस व त्यानंतरच्या घटनाबाह्य खोके सरकारने शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार यांचा भ्रमनिरास केला. लोकसभेत फटका बसला, म्हणून लाडकी बहीण योजना आणली, पण आता याच योजनेवरून हे भाजपवाले महिला भगिनींना धमकावत आहे. भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत दीड हजार रुपये घेऊन काँग्रेसच्या मेळाव्यात जाणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवा, फोटो काढा, असे सांगितले. महायुती सरकार आपल्या खिशातून राज्यातील महिलांना निधी देत नाही. मी तुमच्या सुख-दुःखाचा सदैव साथी आहे. सख्खा जरी नसलो, तरी पक्का भाऊ आहे, असे मत विरोधी पक्षनेते, तथा ब्रह्मपुरीचे विजय वडेट्टीवार यांनी केले.

कार्यक्रमाला अॅड. राम मेश्राम, संदीप गड्डमवार, दिनेश चिटनुरवार, रोहित बोम्मावार, नितीन गोहने, राजेश सिद्धम, विजय मुत्यालवार, गोपाल रायपुरे, विजय कोरेवार, निखिल सुरमवार, उषा भोयर, पुरुषोत्तम चौधरी, किशोर कारडे, संदीप पुण्यापवार, तथा ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष, काँग्रेस पदाधिकारी व अन्य मान्यवर मंचावर होते. वडेट्टीवार पुढे म्हणाले, देशातील व राज्यातील हे महापापी सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करते, पण शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावत आहे. मोदी सरकार आले, तेव्हा तर पंधरा लाख देऊ, असे आश्वासन दिले. आता १,५०० रुपये दिले आणि गाजावाजा करत आहेत.

ब्रह्मपुरी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाच हजार कोटींचे काम आघाडी सरकार असताना सुरू केले. या प्रकल्पाला निधी मिळावा, म्हणून झगडावे लागले, पण यामुळे संपूर्ण क्षेत्रातील ८० टक्के शेती ओलिताखाली आली आहे, तसेच मतदारसंघातील रस्ते, घरकूल योजना, शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहे, वाचनालय, गावागावात सामाजिक सभागृहे, शुद्ध पेयजल योजना, क्रीडांगणाचा विकास, आरोग्य व प्रशासकीय सेवेसाठी प्रशस्त इमारती, यासाठी आमदार म्हणून आपल्या कामाचा लेखाजोखा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडला. ब्रह्मपुरीमध्ये मी लोकप्रतिनिधी नाही, तर तुमचा भाऊ म्हणून काम करतो, भगिनींच्या पाठीशी वेळोवेळी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारchandrapur-acचंद्रपूर