बेडअभावी रुग्णाने स्वत:च्या वाहनातच सोडला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST2021-04-20T04:29:41+5:302021-04-20T04:29:41+5:30
एका कोरोनाबाधिताला कुटुंंबीयांनी स्वत:च्या वाहनातूनच चंद्रपूर येथील शासकीय कोविड रुग्णालयात उपचाराकरिता रविवारी आणले होते. बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी रुग्णाला ...

बेडअभावी रुग्णाने स्वत:च्या वाहनातच सोडला जीव
एका कोरोनाबाधिताला कुटुंंबीयांनी स्वत:च्या वाहनातूनच चंद्रपूर येथील शासकीय कोविड रुग्णालयात उपचाराकरिता रविवारी आणले होते. बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी रुग्णाला भरती करून घेण्यास नकार दिला. कुटुंबाने वारंवार विनंती करूनही रुग्णालयात भरती केले नाही. प्रकृती गंभीर असल्याने इतरत्र जाणे धोक्याचे आहे, असा विचार करून रुग्णाला वाहनातच ठेवून कुटुंबीय प्रतीक्षा करीत होते. मात्र, बेड्सची प्रतीक्षा करीत असताना उपचाराविना रुग्णाचा वाहनातच मृत्यू झाला.
आरोग्य सुविधांची स्थिती वाईट
ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन व बेड्स उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे जीव जात आहेत. आरोग्य सुविधांची स्थिती वाईट आहे. इंजेक्शन व औषधांबाबत एखाद्या जिल्ह्यात टेंडर झाले असेल तर पुन्हा काढायची गरज असू नये, याकडेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे लक्ष वेधल्याची माहिती माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.