Lack of manpower for insurance companies for crop panchayats | पीक पंचनाम्यासाठी विमा कंपन्यांकडे मनुष्यबळाचा अभाव
पीक पंचनाम्यासाठी विमा कंपन्यांकडे मनुष्यबळाचा अभाव

ठळक मुद्दे८९ हजार शेतकरी विमाधारक : ४८ हजार हेक्टर क्षेत्रात यंदा सोयाबीनची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात ३ लाख ४६ हजार क्षेत्र लागवडीखाली येऊ शकते. त्यान्पैकी ४८ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन तर १ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात ८९ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. परतीच्या पावसाने यावेळी प्रचंड नुकसान झाले. परंतु, विमा कंपनीकडे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
शेती प्रामुख्याने पावसावर आधारीत असून ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. अतिवृष्टी अथवा पावसातील खंड आणि किड रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात मोठी घट होते़ लागवडीचा खर्चदेखील निघत नाही़ त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे़
२०१८- १९ या खरीप हंगामातील पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतीम मुदत ३१ जुलै २०१८ तर बिगर कर्जदारी शेतकऱ्यांनी २४ जुलै २०१८ अशी जाहीर करण्यात आली आहे़ शासनाने अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील विविध पिके घेणारे (कुळाने अथवा भाडेकराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) या योजनेत सहभाग घेवू शकतात़ मागील वर्षाच्या खरीप हंगामात जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. शेतकऱ्यांची विम्यापोटी ४९ कोटी ७१ लाख४४ हजार ६१ रूपयांची रक्कम प्रिमियम म्हणून सदर कंपनीला भरली होती. त्यापैकी २४ हजार ७१८ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे.
उर्वरित १६ हजार ४४२ शेतकºयांचे उंबरठा उत्पन्न पीक विम्याच्या निकषात न बसल्याने लाभ मिळू शकला नाही. यंदाच्या खरीप हंगामासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील खरीप हंगामात विमा काढण्यासाठी कापूस उत्पादक शेतकºयांनीच कानाडोळा केला होता़ यंदा असे कदापि घडणार नाही, असा दावा सुत्रांनी केला आहे़

विम्यासाठी आवश्यक कागदपत्रे
खरीप हंगाम २०१८ पासून सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेला सादर करताना बिगर कर्जदार शेतकºयांनी छायाचित्र असलेले बँक खाते पुस्तकाची प्रत, आधारकार्ड छायांकित प्रत सादर करावा. आधारकार्ड उपलब्ध नसल्यास संबंधित कार्डची नोंदणी पावतीसोबत खालीलपैकी कोणताही एक फोटो असलेला पुरावा मान्य केला जाईल. मतदान ओळखपत्र, किसान क्रेडीटकार्ड, नरेगा जॉबकार्ड किंवा वाहनधारक परवाना सादर करता येवू शकते़ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा.

विमा संरक्षणाची अट
पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधित उत्पादनात येणारी घट, पीक पेरणी व लावणीपूर्व तसेच हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे व काढणी पश्चात नुकसान झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळतो. मागील हंगामात ४१ हजार १६० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यातील २४ हजार ७१८ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. शासनाच्या निकषात बसल्यामुळेच हे शेतकरी विमा लाभासाठी पात्र ठरले.

Web Title: Lack of manpower for insurance companies for crop panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.