चारा टंचाईमुळे पशुधनात घट
By Admin | Updated: March 16, 2015 00:45 IST2015-03-16T00:45:53+5:302015-03-16T00:45:53+5:30
उन्हाचा तडाखा आणि त्यात दरवर्षी होणारी दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणवणारी चाराटंचाई, वाढलेले भाव त्यामुळे पशु विकण्याचे वाढलेले प्रमाण कानपा परिसरात वाढले आहे.

चारा टंचाईमुळे पशुधनात घट
कानपा : उन्हाचा तडाखा आणि त्यात दरवर्षी होणारी दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणवणारी चाराटंचाई, वाढलेले भाव त्यामुळे पशु विकण्याचे वाढलेले प्रमाण कानपा परिसरात वाढले आहे. शासनाच्या विविध योजना गावपातळीवर पोहचत नसल्याने जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक घरी गाय, म्हैस, बैल, शेळी व इतर पाळीव प्राण्यांची संख्या मोठी होती. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेतकरी प्राणी पाळायचे. अनेक मंडळी आपल्या हौसेखातर गाय, बैल, म्हैस पाळायचे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेकांनी सुरू केलेले पशुपालन व दुग्ध व्यवसाय भरभराटीत आला होता. एका गुराख्याकडे चराईसाठी जाणाऱ्या गुरांची संख्या २०० ते २५० च्या आसपास असायची. या व्यवसायातून गुराख्याला रोजगार मिळायचा. आजच्यासारखी चारा व पाणी टंचाई पूर्वी नव्हती.
हिरवा चारा मुबलक मिळायचा. परंतु हे चित्र आता इतिहास जमा झाले असून पशुधन आता विक्रीस काढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाळीव जनावरे आता कमी दिसून येतात. (वार्ताहर)