केरोसीन परवानाधारकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:17 IST2018-09-17T22:17:08+5:302018-09-17T22:17:22+5:30
केरोसिनच्या पुरवठासंदर्भांत केंद्र व राज्य शासनाने १ व २१ आॅगस्टला नवे परिपत्रक जाहीर करत आॅगस्टपासून केरोसीनचा पुरवठा पॉस मशिनव्दारे करून शिधापत्रिकाधारकाकडून हमीपत्र भरून घेण्याची अट लावली आहे. केंद्र सरकारच्या या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ केरोसिन हॉकर्स व किरकोळ संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी केंद्र शासनाच्या जनविरोधी परिपत्रकाची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.

केरोसीन परवानाधारकांचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केरोसिनच्या पुरवठासंदर्भांत केंद्र व राज्य शासनाने १ व २१ आॅगस्टला नवे परिपत्रक जाहीर करत आॅगस्टपासून केरोसीनचा पुरवठा पॉस मशिनव्दारे करून शिधापत्रिकाधारकाकडून हमीपत्र भरून घेण्याची अट लावली आहे. केंद्र सरकारच्या या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ केरोसिन हॉकर्स व किरकोळ संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी केंद्र शासनाच्या जनविरोधी परिपत्रकाची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.
मागील दोन वर्षाच्या कालखंडात शिधापत्रिकाधारकांचे संपूर्ण कागदपत्रे स्वस्थ्य धान्य दुकानदारामार्फत पुरवठा कार्यालयाला देण्यात आले. मात्र १ आॅगस्टच्या परिपत्रकानुसार शिधापत्रिकाधारकांकडून संपूर्ण कागदपत्रासह हमीपत्र भरून घेण्याची सक्ती परवानधारकांवर करण्यात येत आहे. परवानाधारक शिधापत्रिकाधारकांकडून वारंवार हमीपत्र भरुन मागत असल्यामुळे शिधापत्रिकाधारक हमीपत्र भरुन देण्याऐवजी परवानाधारकांना शिवीगाळ करीत कितीवेळा हमीपत्र भरुन द्याचे, असा प्रश्न करीत भांडण करतात. त्यामुळे शासनाच्या जनविरोधी धोरणाच्यानिषेधार्थ धरणा आंदोलन करून संघटनेच्या शिष्टमंडळाव्दारे मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत केंद्र व राज्य शासनानाला पाठविण्यात आले.