झेडपीच्या शाळांमध्ये सोईसुविधांचा अभाव

By Admin | Updated: May 28, 2017 00:36 IST2017-05-28T00:36:46+5:302017-05-28T00:36:46+5:30

अलिकडच्या काळात कान्व्हेंट संस्कृती चांगलीच फोफावली आहे. जिकडे-तिकडे याच शाळांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांवर अवकळा आली आहे.

Lack of facilities in ZP schools | झेडपीच्या शाळांमध्ये सोईसुविधांचा अभाव

झेडपीच्या शाळांमध्ये सोईसुविधांचा अभाव

शिक्षक इतर कामात व्यस्त : अनेक इमारती मोडकडीस
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अलिकडच्या काळात कान्व्हेंट संस्कृती चांगलीच फोफावली आहे. जिकडे-तिकडे याच शाळांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांवर अवकळा आली आहे.
यावर मात करण्यासाठी आता शासकीय यंत्रणेकडून प्रत्येक शाळा डिजीटल करण्यात येत आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. शाळा डिजीटल होत असल्या तरी सोईसुविधांचा अभाव आहे. शिक्षकांमध्येच निरुत्साह असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याचे लोकमतने जिल्हाभर केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्था नाही. कुठे माध्यान्ह भोजनाची सोय नाही, जिथे आहे, तिथे जेवण करण्याची सोय नाही. नागभीड, मूल तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती मोडकडीस आल्या आहेत. विद्यार्थी झाडाखाली, मंदिरात बसवून शिक्षणाचे धडे गिरवित आहे. शाळांमध्ये संगणक संच लावले असले तरी वीज बिल न भरल्यामुळे शाळांमधील वीजच गूल झाली आहे. शिक्षक शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामातच व्यस्त असल्याने शिक्षणाचा बोजवारा उडत आहे.

Web Title: Lack of facilities in ZP schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.