कुचनाचा किंग्स विजेता, तर भद्रावतीचा इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब उपविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST2021-03-13T04:52:13+5:302021-03-13T04:52:13+5:30

भद्रावती : येथील पीपराडे मैदानावर पार पडलेल्या तिरंगी क्रिकेट लीग स्पर्धेत ब्लॅक पॅंथर आवारपूर, कुचना किंग्स कुचना, इलेव्हन स्टार ...

Kuchna's Kings winner, while Bhadravati's XI Star Cricket Club runners-up | कुचनाचा किंग्स विजेता, तर भद्रावतीचा इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब उपविजेता

कुचनाचा किंग्स विजेता, तर भद्रावतीचा इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब उपविजेता

भद्रावती : येथील पीपराडे मैदानावर पार पडलेल्या तिरंगी क्रिकेट लीग स्पर्धेत ब्लॅक पॅंथर आवारपूर, कुचना किंग्स कुचना, इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब, भद्रावती या तीन संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत किंग्स क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले, तर उपविजेतेपद इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब, भद्रावतीने पटकावले.

अंतिम सामन्यात विजेत्या संघाने २० षटकात १९५ धावा काढल्या, तर उपविजेत्या संघाला फक्त १४० धावा काढता आल्या.

विजेत्या संघाला रोख रक्कम, चषक तसेच उपविजेत्या संघाला रोख रक्कम व चषक देण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला नगराध्यक्ष अनिल धानोरकर, आशुतोष गयनेवार, प्रशांत डाखरे उपस्थित होते.

स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅच व मॅन ऑफ द सिरीजचे बक्षीस शंकर पिंपळकर व बेस्ट बॉलरचे बक्षीस मनीष ठाकुर यांना गेले. विजेत्या संघात शिव, अमित यादव, अरमान अन्सारी, ए. कैठल, दिवाकर राजभर, मनीष ठाकुर, निखिल बोंडे, निशांत चव्हाण, आर. राजा, शंकर पिंपळकर, अशोक कैठल यांचा समावेश होता. उपविजेत्या संघात रियाज शेख, भूषण माटे, दाऊद सिद्दिकी, मयुर पोटे, निखील गोवरदीपे, नीलेश मेश्राम, प्रदीप खंगार, प्रकाश टिपले, रवी बघेल, रियाज अनवर, आशिष मांडवकर, नोमोष अन्वर यांचा समावेश होता.

Web Title: Kuchna's Kings winner, while Bhadravati's XI Star Cricket Club runners-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.