क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्रीशक्तीचे निर्भीड ऊर्जास्त्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST2021-01-08T05:34:40+5:302021-01-08T05:34:40+5:30

मूल : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्रीशक्तीचे निर्भीड ऊर्जास्त्रोत आहे. आज जग झपाट्याने बदलत आहे. नवनव्या क्षेत्रात, प्रशासनातील उच्च ...

Krantijyoti Savitribai Phule is a fearless source of energy for women | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्रीशक्तीचे निर्भीड ऊर्जास्त्रोत

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्रीशक्तीचे निर्भीड ऊर्जास्त्रोत

मूल : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्रीशक्तीचे निर्भीड ऊर्जास्त्रोत आहे. आज जग झपाट्याने बदलत आहे. नवनव्या क्षेत्रात, प्रशासनातील उच्च पदांवर स्त्रियांनी आणि विशेषतः माळी समाजबांधवांनी आपले नाव कोरण्याची गरज आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी व्यक्त केले.

स्थानिक अखिल भारतीय माळी समाजाच्या वतीने येथील कन्नमवार सभागृहात सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिन कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाला अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, सामाजिक कार्यकर्त्या मीराताई शेंडे, सीमाताई लोनबले, रंजना चौधरी, बहिणाबाई वाढई, रत्नमाला ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

माळी महासंघाच्या राज्य अध्यक्षपदी अरुण तिखे याची निवड झाल्याबद्दल संध्याताई गुरनुले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महात्मा फुले यांच्या भूमिकेतील सर्वेश, तर सावित्रीबाईंच्या भूमिकेतील प्राची मोहुर्ले हे बाल कलाकार लक्ष वेधून घेत होते. संचालन मानसी निकुरे यांनी केले. रेवती सोनुले यांनी प्रास्ताविक केले. गुरु गुरनुले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रा. रामभाऊ महाडोळे, समता परिषद अध्यक्ष प्रा. विजय लोनबले, क्रांतिज्योती सहकारी पतसंस्थेचे गुरु गुरनुले, यशवंत युवा मंचचे प्रमुख राकेश मोहुर्ले, राकेश ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Krantijyoti Savitribai Phule is a fearless source of energy for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.