शंकरपुरात कोविड लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:51+5:302021-04-02T04:28:51+5:30
शंकरपूर : प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरपूर येथे कोविड-१९ लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान गट नेते ...

शंकरपुरात कोविड लसीकरण केंद्र
शंकरपूर : प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरपूर येथे कोविड-१९ लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान गट नेते डॉ. सतीश वारजूकर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी चिमूर पंचायत समिती उपसभापती रोशन ढोक, डॉ. शंभरकर, बोरकर, कर्मचारीवृंद उपस्थित होते.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्व हताश झालेले आहोत. अशामध्येच शासनाने अनेक महिन्यांचा प्रतीक्षेनंतर कोरोना व्हायरस आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण सुरू केले आहे. दिलेल्या निर्देशानुसार आपण नियमांचे पालन करून सर्वांनी पुढाकार घ्यायचा आहे.
समाजामध्ये अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या आहेत. त्यांना न घाबरता आपण सर्व मिळून सहकार्याने कोविड-१९ प्रतिबंधक लस घेऊन शासनाला मदत करू या आणि स्वतःला, कुटुंबाला व देशाला सुरक्षित ठेवू या, असे आवाहन जि.प. सदस्य सतीश वारजूकर यांनी केले आहे.