कोठारीतील फुले-आंबेडकर सांस्कृतिक भवनाची दुर्दशा !

By Admin | Updated: August 28, 2015 01:22 IST2015-08-28T01:22:04+5:302015-08-28T01:22:04+5:30

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव. गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या आसपास. गावातील सामाजिक एकोपा एकसंघ आहे.

Kothari Phule-Ambedkar cultural hallucinations! | कोठारीतील फुले-आंबेडकर सांस्कृतिक भवनाची दुर्दशा !

कोठारीतील फुले-आंबेडकर सांस्कृतिक भवनाची दुर्दशा !


सुरेश रंगारी कोठारी
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव. गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या आसपास. गावातील सामाजिक एकोपा एकसंघ आहे. गावातील नागरिकांना मध्यवर्ती ठिकाणी विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी सामाजिक भवनाची गरज माजी खासदार नरेश पुगलिया यांनी हेरली. त्यांनी खासदार फंडाचा आठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून फुले-आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाची निर्मीती करून सन २०१४ ला ग्रामस्थांसाठी खुले केले. त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपविली. मात्र गेल्या दहा वर्षात या भवनाची दयनीय अवस्था झाली आहे. फुले-आंबेडकरांच्या नावाने असलेले सांस्कृतिक भवन ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणाने मद्यपी व मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनल्याचे विदारक चित्र आहे.
आठ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेले भवन कोणी आपला वाली आहे काय, असाच जणू प्रश्न विचारीत उभे आहे. भवनाच्या आवारात सर्वत्र कचरा साचलेला आहे. मोकाट जनावरांचा यात सदैव वावर असतो. आतील भागात भयावह स्थिती आहे. भवनात लावलेले सर्व पंखे चोरट्यांनी लंपास केले आहे. इलेक्ट्रीक वायरिंग अत्यावस्थ असून कोणी हात लावण्याचा प्रयत्न केल्यास जिविताला धोका निर्माण होतो. शौचालयाची दयनीय स्थिती असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. भवनात सर्वत्र विदारक परिस्थिती असून त्यात कोणी सभा, कार्यक्रम करण्याचे धाडस करीत नाही. भवनाचा आतील व बाहेरील रंगरंगोटी केलेली नसल्याने भवनाकडे कुणी पाहण्याची हिंमत करीत नाही. भवनाच्या खिडकीच्या काचा पुर्णता फुटलेल्या आहेत. फ्लोरिंगची अवस्था न पाहण्यासारखी झाली आहे. भवनाच्या अवती भवती कचऱ्याचे ढिगारे व रस्त्यावर मोठ्या वाहनांची रात्रंदिवस अतिक्रमण असते. परिणामी भवनात प्रवेश कुठून करावा असा प्रश्न निर्माण होतो.
गावातील विविध समारंभ, सभा, बैठका व छोटेखानी कार्यक्रम करण्यासाठी भवनाचा चांगला उपयोग होवू शकतो. गोरगरिबांच्या लग्न कार्यासाठीही भवन उपयोगात येवू शकते. मात्र त्याच्या देखभालीकडे, व्यवस्थेकडे व स्वच्छतेकडे पुर्णत: दुर्लक्ष झाल्याने त्यात कोणतेही कार्यक्रम होणे कठीण आहे. भवनाची रंगरंगोटी, इलेक्ट्रीकची योग्य व्यवस्था, स्वच्छता करून जनतेच्या कल्याणासाठी भवन उपयोगात आणल्या जावे अशी मागणी आहे.

Web Title: Kothari Phule-Ambedkar cultural hallucinations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.