कोरपनात हवे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST2021-01-08T05:35:58+5:302021-01-08T05:35:58+5:30

सार्वजनिक आरोग्य विभागाचे कामकाज अधिक सुलभ व सनियंत्रित करण्यासाठी, तसेच विविध योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती व तालुका ...

Korpanat Have Taluka Health Officer's Office | कोरपनात हवे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय

कोरपनात हवे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय

सार्वजनिक आरोग्य विभागाचे कामकाज अधिक सुलभ व सनियंत्रित करण्यासाठी, तसेच विविध योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती व तालुका स्तरावर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कार्यालयीन कामकाजाकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या पत्रानुसार जिवतीचे कार्यालय तालुकास्तरावर असणे आवश्यक असताना इतरत्र ठिकाणी कुठलीही परवानगी न घेता स्थानापन्न आहे. दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय जिवतीला हलविण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, गडचांदूर येथील कार्यालय कोरपना तालुका मुख्यालयी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव घेऊन व अनेकदा मागणी करूनही स्थानापन्न करण्याचे कुठलेही आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे आरोग्य अधिकारी कार्यालय तालुका मुख्यालयी आणण्याबाबत कोरपनावरच अन्याय का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

Web Title: Korpanat Have Taluka Health Officer's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.