कोंडया महाराज यात्रा महोत्सवाला परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:30+5:302021-02-05T07:37:30+5:30

विदर्भाचे व तेलंगणाचे आराध्य दैवत असलेल्या संत परमहंस कोंडया महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी धाबा येथे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ...

Kondya Maharaj denied permission for the Yatra Festival | कोंडया महाराज यात्रा महोत्सवाला परवानगी नाकारली

कोंडया महाराज यात्रा महोत्सवाला परवानगी नाकारली

विदर्भाचे व तेलंगणाचे आराध्य दैवत असलेल्या संत परमहंस कोंडया महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी धाबा येथे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेला विदर्भासह बाहेर राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत असतात. आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेत जयंतीनिमित्ताने संत परमहंस कोंडया महाराज संस्थान धाबा यांच्या आयोजनतून भजन, कीर्तन यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक प्रकारची दुकाने थाटली जातात, मनोरंजनाची साधने देखील उपलब्ध होत असल्याने या यात्रेनिमित्त आठवडाभर भाविकांची रेलचेल सुरू असते. यंदा देशावर कोरोना विषाणूची लाट पसरली आणि संपूर्ण देशावर संकट कोसळले. या संसर्गजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी शासनाकडून गर्दीच्या ठिकाणी बंदी घालण्यात आल्याने यावर्षी या यात्रा महोत्सवाला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे भाविकांत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

Web Title: Kondya Maharaj denied permission for the Yatra Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.