कोलारा शाळेची आयएसओकडे वाटचाल
By Admin | Updated: February 23, 2017 00:38 IST2017-02-23T00:38:42+5:302017-02-23T00:38:42+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती चिमूर अंतर्गत आदिवासी दुर्गम भागात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ...

कोलारा शाळेची आयएसओकडे वाटचाल
जिल्हा परिषद शाळा : सोईसुविधांनी सुसज्ज, परिसरही स्वच्छ
चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती चिमूर अंतर्गत आदिवासी दुर्गम भागात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेले कोलारा (तुकूम) या गावामध्ये जिल्हा परिषदची एकमेव पहिली ते सावतीपर्यंतची शाळा आहे. त्यामध्ये ११२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावाची लोकसंख्या जवळपास २२०० असून आदिवासी भागामध्ये नावारुपास येत असलेली गावातील एकमेव जिल्हा परिषदची शाळा आहे. सदर शाळा ही सोयीसुविधांनी सुसज्ज व देखणा परिसर हे या शाळेचे खास वैशिष्ट्य आहे.
सदर शाळेत ई- लर्निंगची सुविधा विशेष म्हणजे एनसीपीडीआय नागपूर यांचे सौजन्याने बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेला क्षेत्रीय प्रबंधक नागपूर कार्यालयाचे वानरे यांचेकडून रुपये ७५ हजार किंमतीचे ५० नग डेस्बबेंच नुकतेच प्राप्त झाले आहे. तसेच आंध्रप्रदेशचे कॅबीनेटमंत्री आरव्हीएसके रंगाराव (बोंबीली) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचेकडून विद्यार्थ्यांना उच्च प्रतीची स्कूलबॅग रुपये ४० हजार किंमतीची भेट देण्यात आली आहे. कोलारा येथील वन समितीच्या वतीने शुद्ध पिण्याचे पाणी व थंड पाण्यासाठी आॅरो वॉटर फिल्टर अंदाजे ६० हजार रुपये किंमतीचे नुकतेच शाळेला भेट देण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक अशोक वैद्य यांनी चालू शैक्षणीक सत्रात अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये शैक्षणिक उठाव मिळविला आहे. तसेच सीएमपीडीआय नागपूर यांचेकडून माध्यान्ह भोजन बैठक व्यवस्थेकरिता भोजन शेड व सांस्कृतीक कार्यक्रमासाठी स्टेजकरीता ५ लाख २० हजार रुपयाचे मंजूर करण्यात आले आहे.
शाळेमध्ये संगणक कक्ष स्वतंत्र मुत्रीघर, किचनशेड, सांस्कृतीक मंच, दिव्यांगासाठी रॅम्पची व्यवस्था, विविध खेळाचे साहित्य, वाचनालय आदी सुविधा उपलब्ध आहे. शाळेमध्ये नियमित परिपाठ, अभ्यासगट, शालेय मंत्रीमंडळ, मिना राजू मंच, थोर व्यक्तींच्या जयंत्या- पुण्यतिथी, माझी स्वच्छ शाळा, वृक्षारोपण, विविध ड्रेस कोड, तंबाखू मुक्त शाळा, औषधी वनस्पती लागवड, परसबाग, जी तारखी तो पाढा आदी उपक्रम राबविल्या जातात. शाळा स्पर्धेत टिकण्याकरिता गावकरी श्रमदान, वस्तुरुपाने मदत, रोख रुपाने आर्थिक मदत, विविध शैक्षणिक सांस्कृतीक तथा सामाजिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग दर्शवितात.
या सर्व बाबींमध्ये शाळेचे मुख्याध्यापक अशोक वैद्य, तंत्रस्नेही शिक्षण प्रल्हाद पाल, उपक्रमशिल शिक्षक महादेव शेडाम, पर्यावरणवादी शिक्षक नरेंद्र कामडी, मिना राजू मंच प्रमुख बेबी गजभीये, सर्वगुण संपन्न व्यक्तीम्व असलेले विलास सारये आदी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना वाघमारे व इतर सदस्य गण, गावाचे ग्रामसेवक गजभे, सरपंच रत्नमाला गणवीर व इतर सदस्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. (तालुका प्रतिनिधी)