कोडाय्या नामाने धाबा नगरी दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:25 IST2021-02-15T04:25:16+5:302021-02-15T04:25:16+5:30

धाबा : महाराष्ट्र व तेलंगणाचे आराध्य दैवत संत परमहंस कोंडय्या महाराज यांची जयंती यात्रा ...

Kodayya Naamane Dhaba Nagari Dumdumali | कोडाय्या नामाने धाबा नगरी दुमदुमली

कोडाय्या नामाने धाबा नगरी दुमदुमली

धाबा : महाराष्ट्र व तेलंगणाचे आराध्य दैवत संत परमहंस कोंडय्या महाराज यांची जयंती यात्रा कोरोनाचे संकट लक्षात घेता अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. शुक्रवारी पहाटे महाराजांच्या समाधीवर महाअभिषेक करण्यात आला.

त्यानंतर सभागृहातून पालखी काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गाने पालखी फिरविण्यात आली. भाविकांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत केले तर बारमाई चौकात सेवा भावी मंडळाने भाविकांसाठी नाश्ताची व्यवस्था केली. पालखी सोहळ्यामध्ये वाल्मीकी लेजीम पथक सहभागी झाले होते. भक्त कोंडय्या नामाचा गजर करत होते. दोन दिवस चालणाऱ्या सोहळ्यात परंपरेनुसार अग्निकुंड प्रभावडीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच सोमवारी गोपालकाला असून कर्यक्रमाची सांगता होणार आहे.

Web Title: Kodayya Naamane Dhaba Nagari Dumdumali