चंद्रपुरातील आझाद बाग समस्यांच्या विळख्यात

By Admin | Updated: August 27, 2015 01:16 IST2015-08-27T01:16:46+5:302015-08-27T01:16:46+5:30

शहरातील आझाद बागेची अतिशय दुरवस्था झाली असून त्यामुळे आरोग्य सुदृढ करण्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

Knowledge of Azad Bagh community in Chandrapur | चंद्रपुरातील आझाद बाग समस्यांच्या विळख्यात

चंद्रपुरातील आझाद बाग समस्यांच्या विळख्यात

मनपाला निवेदन : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
चंद्रपूर : शहरातील आझाद बागेची अतिशय दुरवस्था झाली असून त्यामुळे आरोग्य सुदृढ करण्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे महासचिव तथा नगरसेवक प्रविण पडवेकर यांनी मंगळवारी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार यांना निवेदन दिले आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बागेत दररोज सकाळी शेकडो लोक फिरण्यासाठी येतात. मात्र येथे येणाऱ्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. बागेतील ट्रॅकवर सदैव पाणी साचलेले असते. त्यामुळे त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करत चालावे लागते. बागेतील लॉनची अतिशय दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह नाही. जागोजागी घाण साचलेली आहे. नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस नाहीत. लहानमुलांसाठी सुस्थितीत खेळण्याचे साहित्य नाही. अशा प्रकारच्या विविध समस्यांनी सध्या या बागेला विळखा घातला आहे. मात्र दुसरीकडे शहराच्या मध्यभागी असलेल्या आझाद बागेची अतिशय दुरावस्था झाली आहे. या समस्यांना तातडीने मार्गी न लावल्यास महानगरपालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा संपेस्तोवर उपोषणाला बसण्याचा इशारा प्रवीण पडवेकर यांनी निवेदनातून दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Knowledge of Azad Bagh community in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.