किंग्स क्रिकेट संघ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST2021-03-15T04:26:33+5:302021-03-15T04:26:33+5:30
: तिरंगी क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन भद्रावती येथे नुकतेच करण्यात आले. यामध्ये ब्लॅक पॅंथर आवारपूर, कुचना किंग कुचणा, इलेव्हन ...

किंग्स क्रिकेट संघ विजेता
: तिरंगी क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन भद्रावती येथे नुकतेच करण्यात आले. यामध्ये ब्लॅक पॅंथर आवारपूर, कुचना किंग कुचणा, इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब भद्रावती या तीन संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत किंग्स क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले तर उपविजेतेपद इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब भद्रावतीने पटकाविला.
अंतिम सामन्यात विजेत्या संघाने २० षटकात १९५ धावा काढल्या तर उपविजेत्या संघाला फक्त १४० धावा काढता आल्या.
विजेत्या संघाला रोख रक्कम तसेच चषक तसेच उपविजेत्या संघाला रोख रक्कम व चषक देण्यात आले .बक्षीस वितरण कार्यक्रमाला नगराध्यक्ष अनिल धानोरकर, आशुतोष गयनेवार, प्रशांत डाखरे उपस्थित होते.
स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅच व मॅन ऑफ द सिरीजचे बक्षीस शंकर पिंपळकर व बेस्ट बॉलरचे बक्षीस मनीष ठाकूर यांना गेले. उपविजेता संघात रियाज शेख ,भूषण माटे ,दाऊद सिद्दिकी ,मयूर पोटे ,निखिल गोवरदिपे, नीलेश मेश्राम, प्रदीप खंगार, प्रकाश टिपले ,रवी बघेल ,रियाज अनवर,आशिष मांडवकर नोमोष अन्वर यांचा समावेश होता. तर विजेत्या संघात शिव, अमित यादव, अरमान अन्सारी ,ए .कैठल, दिवाकर राजभर ,मनीष ठाकूर ,निखिल बोंडे , निशांत चव्हाण, आर राजा, शंकर पिंपळकर ,अशोक कैठल यांचा समावेश होता.