शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:13 IST

यात दोन नामांकित डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका असून हे रॅकेट एका किडनीचा सौदा ५० ते ८० लाखांत करायचे. मात्र, पीडिताला केवळ पाच ते आठ लाख रुपयेच द्यायचे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बुधवारी माध्यमांना दिली.

चंद्रपूर : किडनी प्रकरणाला आता गंभीर वळण आले आहे. याचे भारतातील केंद्र तामिळनाडूतील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटल असल्याचे पुढे आले आहे. येथे शेकडो जणांच्या किडनी काढण्यात आल्याचा संशय आहे. यात दोन नामांकित डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका असून हे रॅकेट एका किडनीचा सौदा ५० ते ८० लाखांत करायचे. मात्र, पीडिताला केवळ पाच ते आठ लाख रुपयेच द्यायचे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बुधवारी माध्यमांना दिली.एलसीबी पथकाने ताब्यात घेतलेल्या दिल्लीतील डॉ. रवींद्रपाल सिंगला दिल्ली न्यायालयातून ट्रॉन्झिट रिमांड मिळाला. २ जानेवारी २०२६ पर्यंत मुख्य न्यायदंडाधिकारी चंद्रपूर यांच्या समक्ष हजर व्हावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी हा श्रीलंकेत फरार झाल्याचा संशय आहे. एलसीबीची चार पथके देशभरात आरोपींचा शोधात आहे.

डॉक्टर पुरावे करायचे नष्टपीडित रोशन कुळे याने डाॅ. क्रिष्णा व हिमांशू भारद्वाजच्या माध्यमातून किडनी विक्री केली. त्यांच्या मोबाइल डेटावरून पोलिस तपास दिल्ली व तामिळनाडूच्या डॉक्टरांपर्यंत पोहोचला.डॉ. रवींद्रपाल सिंग हा दिल्लीवरून त्रिचीतील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये डाॅ. राजरत्नम गोंविदस्वामीच्या मदतीने किडनी काढून याबाबतचे पुरावे नष्ट करायचे. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर किडनी काढण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

तिरुची कनेक्शन तामिळनाडूतील तिरुची (तिरुचिरापल्ली) येथील एका हॉस्पिटलमध्ये किडनीचा गोरखधंदा सुरू होता. ते डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी यांच्याशी संबंधित असल्याची माहिती आहे.

लाखोंचे कमिशनकिडनी घेणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल ५० ते ८० लाख रुपये उकळत होते. यामध्ये डॉ. रवींद्रपाल सिंगला १० लाख रुपये, डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी यांना सर्जरी व हॉस्पिटीलिटीमुळे २० लाख, डाॅ. क्रिष्णा (रामकृष्ण सुंचू) व साथीदाराला २० लाख रुपयांचे कमिशन द्यायचे. किडनी देणाऱ्याची केवळ पाच ते आठ लाखांत बोळवण करायचे.

तपासात तामिळनाडू सरकारचे असहकार्यस्टार किम्सचे एमडी डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी हे तामिळनाडूतील  मंत्र्याचे नातेवाईक आहेत. त्याला पकडण्यासाठी एलसीबीचे पथक पोहोचलेसुद्धा होते. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना अटक करता आली नाही.

अशात ते फरार झाले. ट्रॉन्झिट रिमांडवर असलेले डॉ. रवींद्रपाल सिंगचे सन २०२२ मध्ये पद्मश्रीसाठी नामांकन झाल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kidney racket hub in Tamil Nadu; Doctors involved, crores amassed.

Web Summary : A kidney racket in Tamil Nadu's Trichy, centered at Star Kims Hospital, involved doctors extracting kidneys from hundreds for profit. Victims received little compensation, while doctors earned lakhs in commission. Investigation hampered by political interference; suspects are on the run.