घुग्घुसमधून अभियांत्रिकी झालेल्या युवकाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:34+5:302021-01-19T04:29:34+5:30
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब खाडे यांनी घुग्घुस गाठून शुभमच्या आईवडिलांकडून माहिती घेत शोधकार्य सुरू केले. दरम्यान, शुभमची ...

घुग्घुसमधून अभियांत्रिकी झालेल्या युवकाचे अपहरण
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब खाडे यांनी घुग्घुस गाठून शुभमच्या आईवडिलांकडून माहिती घेत शोधकार्य सुरू केले. दरम्यान, शुभमची एमएच ३४ एएस ६८१५ क्रमांकाची दुचाकी साईनगरात आढळली. शुभमचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. शुभमच्या मित्रांकडूनही कसून चौकशी केली. मात्र काहीही थांगपत्ता लागला नाही. मुलाचे वडील दिलीप फुटाणे हे वेकोलीच्या नायगाव कोळसा खाणीत इलेक्ट्रिकल विभागात सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. ते घुग्घुस रामनगर बी टाइप कामगार वसाहतीमध्ये वास्तव्यास आहे. शुभम हा त्यांना एकुलता एक मुलगा आहे. शुभमने नागपुरातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या तो नोकरीच्या शोधात होता. घटनेची तक्रार प्राप्त होताच ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी तत्काळ दखल घेत याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी अवगत केले. कसून तपास सुरू आहे.