खुशाल अंड्रस्कर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:10 IST2021-08-02T04:10:11+5:302021-08-02T04:10:11+5:30

चंद्रपूर : वित्त विभागातील सहायक लेखा अधिकारी खुशाल अंड्रस्कर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या निमित्त जिल्हा परिषद चंद्रपूर ...

Khushal Andraskar felicitated on his retirement | खुशाल अंड्रस्कर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

खुशाल अंड्रस्कर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

चंद्रपूर : वित्त विभागातील सहायक लेखा अधिकारी खुशाल अंड्रस्कर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या निमित्त जिल्हा परिषद चंद्रपूर येथील लेखा विभागात शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक मातकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे, पशुसंवर्धन अधिकारी अविनाश सोमनाथे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रीती खारतुडे, विजय पिदुरकर, दीपक जेऊरकर आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी दीपक जेऊरकर, अशोक मातकर, अविनाश सोमनाथे, प्रीती खारतुडे, शाम वाखर्डे आदींनी खुशाल अंड्रस्कर यांच्या प्रशासकीय कार्याची प्रशंसा केली. संचालन पीयूष भांदककर, आभार सुनील बोढे यांनी मानले.

कार्यक्रमासाठी गायत्री खोब्रागडे, रिमा सोरते, प्रशांत घोरसारीया, धर्मपाल अलोने, मंगेश वाघाडे, अनिल वाटघुरे, सुधाकर देवतळे व सूर्यभान माणूसमारे यांनी परिश्रम घेतले.

 

010821\01cpr_2_01082021_32.jpg

 

खुशाल अंड्रस्कर यांचा सत्कार करताना उपस्थित मान्यवर.

Web Title: Khushal Andraskar felicitated on his retirement