खेमजईत सामाजिक जाणिवा, हास्य व प्रेम कवितांनी रंगले कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:13+5:302021-02-05T07:43:13+5:30

वरोरा : तालुक्यातील खेमजई येथे जिल्ह्यातील निमंत्रितांचे कविसंमेलन बहारदार कवितांनी रंंगले. जिल्ह्यातील कवींच्या उपस्थितीने गावकरीही भारावले. सामाजिक जाणिवा, प्रेम, ...

Khemjait is a gathering of poets full of social awareness, humor and love poems | खेमजईत सामाजिक जाणिवा, हास्य व प्रेम कवितांनी रंगले कविसंमेलन

खेमजईत सामाजिक जाणिवा, हास्य व प्रेम कवितांनी रंगले कविसंमेलन

वरोरा : तालुक्यातील खेमजई येथे जिल्ह्यातील निमंत्रितांचे कविसंमेलन बहारदार कवितांनी रंंगले. जिल्ह्यातील कवींच्या उपस्थितीने गावकरीही भारावले. सामाजिक जाणिवा, प्रेम, हास्य कवितेच्या माध्यमातून ग्रामप्रबोधनही घडून आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रमोद गंपावार, अध्यक्षस्थानी माजी सरपंच नारायण कापटे, विलास चौधरी उपस्थित होते. पं. स.पोंभुर्णाचे गटविकास अधिकारी व खेमजई गावचे सुपुत्र कवी धनंजय साळवे व कुटुंबीयांच्या पुढाकाराने गावात कविसंमेलन पार पडले. निमित्त होते सामाजिक कार्यकर्ते अशोक शंकर साळवे यांच्या षष्ट्यब्दिपूर्ती सोहळ्याचे.

कवी नरेशकुमार बोरीकर यांच्या संचालनात जिल्ह्यातील प्रथितयश कवी अविनाश पोईनकर, ईश्वर टापरे, विजय वाटेकर, धर्मेंद्र कन्नाके, सुरेंद्र इंगळे, गोपाल शिरपूरकर, सुधाकर कन्नाके, मिलेश साकुरकर, नरेंद्र कन्नाके, पंडित लोंढे, चंद्रशेखर कानकाटे, जयवंत वानखेडे, चंदू झुरमुरे, सुनील बावणे, संतोषकुमार उईके, अरुण घोरपडे यांनी सामाजिक प्रबोधनाच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. खेमजई येथील ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन आदर्श ग्राम घडवण्याचा कृतियुक्त संकल्प करावा, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मत धनंजय साळवे व मान्यवरांनी व्यक्त केले. आभार शीतल साळवे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

कवी नरेशकुमार बोरीकर यांच्या संचालनात जिल्ह्यातील प्रथितयश कवी अविनाश पोईनकर, ईश्वर टापरे, विजय वाटेकर, धर्मेंद्र कन्नाके, सुरेंद्र इंगळे, गोपाल शिरपूरकर, सुधाकर कन्नाके, मिलेश साकुरकर, नरेंद्र कन्नाके, पंडित लोंढे, चंद्रशेखर कानकाटे, जयवंत वानखेडे, चंदू झुरमुरे, सुनिल बावणे, संतोषकुमार उईके, अरुण घोरपडे यांनी सामाजिक प्रबोधनाच्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. खेमजई येथील ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन आदर्श ग्राम घडवण्याचा कृतियुक्त संकल्प करावा, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मत धनंजय साळवे व मान्यवरांनी व्यक्त केले. आभार शितल साळवे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Web Title: Khemjait is a gathering of poets full of social awareness, humor and love poems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.