खाकी पोषाखाने दिला माणुसकीचा परिचय

By Admin | Updated: September 7, 2016 00:56 IST2016-09-07T00:56:14+5:302016-09-07T00:56:14+5:30

पोलीस विभागाच्या खाकी गणवेशाबद्दल सर्वसामान्य समाजामध्ये असलेली भिती सर्वज्ञात आहे.

Khaki Poshakhaya introduces humanity | खाकी पोषाखाने दिला माणुसकीचा परिचय

खाकी पोषाखाने दिला माणुसकीचा परिचय

कृतज्ञता : धोकटे यांनी घेतला विद्यार्थी घडविण्याचा ध्यास
यशवंत घुमे आयुधनिर्माणी (भद्रावती)
पोलीस विभागाच्या खाकी गणवेशाबद्दल सर्वसामान्य समाजामध्ये असलेली भिती सर्वज्ञात आहे. पोलिसांपासून सर्वसामान्य माणूस हा नेहमीच फटकून वागत असतो. मात्र या रूक्ष समजल्या जाणाऱ्या खाकी गणवेशातही समाजमन जपणारी माणसे आढळून येत असतात. भद्रावती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सुशील धोकटे यांनी आपले कर्तव्य सांभाळत आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून अवैध व्यवसायी पार्श्वभूमी लाभलेल्या एका ध्येय वेड्या तरुणामधील ‘टॅलेंट’ ओळखून त्याला दत्तक घेत त्याचे शैक्षणिक भविष्य उज्वल करून त्याला त्याची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने विडा उचलला आहे. त्यासाठी उपनिरीक्षक धोकटे यांनी त्या विद्यार्थी युवकाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.
अधिक विचारपूस केल्यावर अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीचा मुलगा कला शाखेत द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे कळले. त्याला त्याच्या वडीलांच्या अवैध व्यवसायाबद्दल विचारले असता तो खजील झाला. आपल्याला हे आवडत नसल्याचे सांगितले. मात्र याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याची खंतही त्याने व्यक्त केली. आपनाला पुढे एमपीएससी परिक्षेत पास होवून चांगला अधिकारी होण्याची भावना त्याने धोकटे यांचेकडे बोलून दाखविली. आपल्या कुटुंबाला अवैध धंद्याच्या गर्तेतून काढण्याची इच्छाही व्यक्त केली. या चिखलातल कमळाला धोकटे यांनी हेरले यापुढे केवळ अभ्यासाकडेच लक्ष देण्याचा सल्ला देवून धोकटे यांनी या मुलाच्या भविष्यातल शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. त्यासाठी स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील वाचनालयात पैसे भरून स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीेने अभ्यासासाठी वाचनालय खुले करून दिले. त्यानुसार त्या मुलाने आपले सारे लक्ष आता अभ्यासाकडे केंद्रीत केलेले आहे. तो विद्यार्थी दररोज नियमीतपणे सकाळी १० ते ५ या ग्रंथालयीन वेळेत बसत असल्याचे ग्रंथपाल डॉ.सुधीर आष्टुनकर यांनी सांगितले. धोकटे स्वत: त्याच्या अभ्यासाचा आढावा दर दोन तीन दिवसांनी घेत असतात. पुढे या विद्यार्थ्याला येणाऱ्या शैक्षणिक खर्चाचीही जबाबदारी त्यांनी घेतली आहे. उपनिरीक्षक धोकटे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील असून भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये मागील दीड वर्षापासून कार्यरत आहे. त्यांची ही पहिलीच पोस्टींग आहे. आपल्या या छोट्याशा कार्यातून एखाद्या परिवाराचे भविष्य सुधारत असेल तर त्यासारखे दुसरे पुण्य नाही ही त्यांची भावना आहे. धोकटे यांचा शब्द पूर्ण करण्यासाठी सुंदरही अहोरात्र परिश्रम घेत अभ्यासात गर्क आहे. मेहनत घेत आहे. सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे.

इंग्रजीत बोलतो
आरोपीचा मुलगा
मध्यंतरी भद्रावती परिसरातील एका अवैध दारूव्यवसायीकाला भद्रावती पोलिसांनी अटक केली. चौकशीकरिता ही केस उपनिरीक्षक धोकटे यांच्याकडे आली. या प्रकरणाची चौकशी करीत असताना त्या व्यावसायिकाचा सुंदर (काल्पनीक नाव) नावाचा २० वर्षीय मुलगा या केसच्या संदर्भात पुढे आला. चर्चेदरम्यान हा मुलगा अस्खलीत इंग्रजीतून संवाद साधत होता. तेव्हा त्या मुलातल टॅलेन्ट पाहून उपनिरीक्षक धोकटे यांचे कुतुहल जागे झाले. त्यांनी या तरुणाची आत्मीयतेने विचारपूस केली तेव्हा तो मुलगा आरोपीचा मुलगा असल्याचे कळले.

Web Title: Khaki Poshakhaya introduces humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.