कास्ट्राईब संघटनेचे संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन

By Admin | Updated: April 1, 2015 01:21 IST2015-04-01T01:21:33+5:302015-04-01T01:21:33+5:30

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना तालुका शाखा चंद्रपूरच्यावतीने चंद्रपूर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या समस्या ...

Kastrib organization cadre development officers request | कास्ट्राईब संघटनेचे संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन

कास्ट्राईब संघटनेचे संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन

चंद्रपूर : कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना तालुका शाखा चंद्रपूरच्यावतीने चंद्रपूर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी संवर्ग विकास अधिकारी राजू आनंदपवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी कास्ट्राईब संघटनेने तयार केलेले नवीन वर्षाचे कॅलेन्डर बीडीओंना देण्यात आले. कास्ट्राईब संघटनेची समस्या निवारण सभा दर तीन महिन्याने घेण्यात यावी, दर महिन्याच्या एक तारखेला वेतन अदा करण्यात यावे, सेवा ज्येष्ठता यादीतील चुकांची दुरुस्ती करुन सेवा ज्येष्ठता यादी प्रकाशित करण्यात यावी, दुय्यम सेवापुस्तक अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिर लावणे, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन सभेच्यावेळी संघटनेला लेखी आदेश देणे व स्वागत समितीत योग्य स्थान देणे, जी.पी.एफ पावत्या उपलब्ध करून देणे, एलआयसी आणि सोसायटीचे हप्ते संबंधित कार्यालयाला लवकरच पाठविणे इत्यादी समस्या सोडविण्यासाठी एप्रिल महिन्यात सभा घेवून प्रलंबित समस्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन सवंर्ग विकास अधिकारी राजू आनंदपवार यांनी दिले.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष मोरेश्वर बारसागडे, जिल्हा कोषाध्यक्ष शैलेन्द्र भगत, तालुकाध्यक्ष सुनील ढोके, तालुका सरचिटणीस प्रमोद गेडाम, तालुका कार्याध्यक्ष मिलींद झाडे, तालुका कोषाध्यक्ष शंकर आसमपल्लीवार, तालुका उपाध्यक्ष कमलाकर पाटील, जिल्हा सरचिटणीस संजय धोंगडे, अशोक राऊत उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Kastrib organization cadre development officers request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.