कर्नाटका एम्टा कोळसा खाण बंद

By Admin | Updated: September 22, 2014 23:15 IST2014-09-22T23:15:58+5:302014-09-22T23:15:58+5:30

विभागीय कामगार आयुक्त नागपूर यांनी बोलाविलेल्या कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनांच्या बैठकीत चर्चा फिस्कटल्याने अखेर येथील कार्यरत कामगार संघटनांनी सोमवार

Karnataka Emata closed coal mine | कर्नाटका एम्टा कोळसा खाण बंद

कर्नाटका एम्टा कोळसा खाण बंद

भद्रावती : विभागीय कामगार आयुक्त नागपूर यांनी बोलाविलेल्या कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनांच्या बैठकीत चर्चा फिस्कटल्याने अखेर येथील कार्यरत कामगार संघटनांनी सोमवार (दि. २२) पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे खाण बंद पडून कर्नाटका एम्टाचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे.
३१ आॅक्टोबर २०१४ ला कामगार आणि कंपनी यांच्यातील जुना करार संपुष्टात आल्यानंतर खाणीत कार्यरत असलेल्या कोयला मजदूर काँग्रेस (इंटक) व राष्ट्रीय कोयला कामगार संघ या दोन्ही कोळसा कामगार संघटनांनी एकत्रित येऊन कामगार विषयीचा नव्या कराराचा प्रस्ताव कंपनीला सादर केला. त्यावर कंपनीने खाणीतील कामगारांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले. त्यात खाण परिसरातील कॅन्टींग बंद करण्यात आली व २५ डंफर आॅपरेटरच्या बदल्या अन्य राज्यात करण्यात आल्या. त्यानंतर संघटना व व्यवस्थापनामध्ये अनेकदा चर्चा झाली. मात्र त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने उभय पक्षात तणावाचे वातावरण निर्माण होत गेले. ३, १० व १२ सप्टेंबरला विभागीय कामगार आयुक्तांनी कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापनाच्या बैठका बोलाविल्या व त्यात तडजोड घडवून आणण्याचे प्रयत्न केले. मात्र यात वाटाघाटी फिस्कटल्याने कामगार संघटनांनी कंपनी व्यवस्थापनाला तीन दिवसाचा अल्टीमेटम देत अखेर आजपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरूवात केली. यासंदर्भात आपण आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे इंटक नेते एस.क्यु. जामा यांनी सांगितले तर राष्ट्रीय कोयला कामगार संघाचे नेते प्रमोद मोहोड यांनी सांगितले की सर्व कामगारांनी एकत्रित येऊन आपल्या रास्त मागण्या मान्य करण्यासाठी एकजूट होऊन शांततेने कंपनी विरोधात लढण्याचे आवाहन केले. याप्रसंगी माजरी क्षेत्राचे इंटक नेते धनंजय गुंडावार, संजय दुबे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Karnataka Emata closed coal mine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.