कर्मयोगी बाबांची जयंती आनंदवनात
By Admin | Updated: December 28, 2016 02:02 IST2016-12-28T02:02:14+5:302016-12-28T02:02:14+5:30
कर्मयोगी बाबा आमटे यांच्या २६ डिसेंबर रोजीच्या जयंतीनिमित्त आनंदवनातील श्रद्धावन येथील समाधी

कर्मयोगी बाबांची जयंती आनंदवनात
वरोरा : कर्मयोगी बाबा आमटे यांच्या २६ डिसेंबर रोजीच्या जयंतीनिमित्त आनंदवनातील श्रद्धावन येथील समाधी स्थळावर आबालवृद्धांनी जावून समाधीचे दर्शन घेतले.
कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जन्मदिनी आनंदवनात श्रद्धावन परिसरात झालेल्या कार्यक्रमात महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त डॉ. शितल आमटे- करजगी यांनी आनंदवनातील बंधू-भगीनी, युवक- युवती यांनी बँकेत खाती काढावी व एटीएमचा वापर प्रत्येक वेळी करुन आनंदवन स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजे, याकरिता सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तर महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी पर्यावरण विषयी जनजागृती करण्याचे आवाहन याप्रसंगी केले. यावेळी गौतम करजगी, आनंदवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ, कविश्वर, आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आनंदवनातील कार्यकर्ते, तसेच कर्मयोगी बाबा यांच्यावर प्रेम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सोमवारला आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथे कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. जोगी, रहाटे, प्रा. पुसदेकर, प्रा. श्रीराव व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)