कढोली जि. प. शाळेची इमारत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:32 IST2019-09-03T00:31:50+5:302019-09-03T00:32:15+5:30

जि. प. शाळेच्या इमारतीला जागोजागी भेगा पडल्याने पाणी गळते. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे इमारतीचे कवेलू फुटले तर काही वादळाने उडाले. अशा धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. जि. प. या इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव तयार करणे गरजेचे होते.

Kadholi Dist. W School building dangerous | कढोली जि. प. शाळेची इमारत धोकादायक

कढोली जि. प. शाळेची इमारत धोकादायक

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : नवीन इमारत बांधण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : कढोली (बु) येथील जिल्हा परिषद शाळेची सन १९४९ रोजी स्थापना झाली. इमारतीचे बांधकाम सुमारे १९५९ च्या दरम्यान करण्यात आले. यासाठी गावकऱ्यांनी श्रमदान केले होते. अनेक वर्षे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम विद्यादानाचे कार्य या शाळेने केले. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी धोक्याची ठरली आहे.
जि. प. शाळेच्या इमारतीला जागोजागी भेगा पडल्याने पाणी गळते. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे इमारतीचे कवेलू फुटले तर काही वादळाने उडाले. अशा धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. जि. प. या इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव तयार करणे गरजेचे होते.
परंतु, दुर्लक्ष केल्या जात आहे. शिक्षक व गावकऱ्यांनी ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदला निवेदन देऊनही संबंधित प्रशासनाने या इमारतीकडे लक्ष दिले नाही. परिणामी, ही इमारत शेवटच्या घटका मोजत आहे.
जिल्ह्यातील जि. प. शाळांच्या जीर्ण इमारतींसाठी लाखोची तरतुद करण्यात आली. परंतु कढोली येथील शाळेचा समावेश झाला नाही, असा आरोप गावकºयांनी केला आहे. जि. प. प्रशासनाने तातडीने निधीची तरतुद करून पावसाळा संपण्यापूर्वीच बांधकाम करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.

Web Title: Kadholi Dist. W School building dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.