शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करांनी पोखरला वर्धा नदीचा कढोली-धिडसी घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 17:46 IST

निवडणूक आटोपूनही यंत्रणा ढिम्म: नदीपात्रात रात्रभर ट्रॅक्टरचा आवाज

लोकमत न्यूज नेटवर्क सास्ती : कोरपना-राजुरा तालुक्याच्या सीमावर्ती भागातून वाहत असलेल्या वर्धा नदीच्या कढोली, धिडशी घाटावर रेती तस्करांचा धुमाकूळ सुरू आहे. रात्रभर ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजात वर्धा नदी अक्षरशः पोखरली जात असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.

राजुरा तालुक्यातील वर्धा नदीच्या धिडशी घाटावरून परिसरातील रेती तस्करी जोरात सुरू आहे. कढोली घाटातही हीच परिस्थिती असून, ट्रॅक्टरने रात्रंदिवस रेतीची खुलेआम तस्करी केली जात आहे. रेती वाहतुकीचा मार्ग कढोली गावातून असल्याने गावातील नागरिकांना ट्रॅक्टरचा आवाज व धुळीचा प्रचंड त्रास होत आहे.

रात्रंदिवस भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने अपघाताची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे. राजकीय सलगी असलेले स्थानिक नेते तस्करीत गुंतल्याने महसूल विभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत, असा आरोप नागरिकांनी केला. कढोली घाटावरून सर्वाधिक रेती तस्करी होत असल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरांना रेतीचा पुरवठाकोरपना व राजुरा तालुक्यात मोठे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे अमर्यादपणे रेतीचा अवैधपणे उपसा होत आहे. या व्यवसायात अत्याधुनिक यंत्राचा वापर रेती तस्करांकडून केला जात असून, यात जेसीबी व ट्रॅक्टरच्या मदतीने नदीपात्रातील रेतीचा उपसा करून मोठमोठ्या टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे शहराकडे पाठविली जाते

उपजई घाटावरील वाहतुकीने रस्त्यांची ऐसीतैशीकढोलीपासून एक किमी अंतरावर उपजई घाटावरूनही रात्रंदिवस रेतीची वाहतूक सुरू असते. त्यामुळे परिसरातील रस्त्यांची ऐसीतेंशी झाली. धिडशी व कढोली घाटातील निघणाऱ्या ट्रॅक्टरमुळे रस्त्यांची वाट लागली. 

टॅग्स :riverनदीmafiaमाफियाchandrapur-acचंद्रपूर