शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीयस्तरावर ‘कचरकांदा’ उपेक्षित

By admin | Updated: September 22, 2015 01:37 IST

शासनाच्या दप्तरी कुठलीही नोंद नसलेला परंतु भरपूर जीवनसत्व असलेला ‘कचरकांदा’ शासकीयस्तरावर अद्यापही

पोंभूर्णा : शासनाच्या दप्तरी कुठलीही नोंद नसलेला परंतु भरपूर जीवनसत्व असलेला ‘कचरकांदा’ शासकीयस्तरावर अद्यापही उपेक्षित आहे.कांदा म्हणजे कंद. कंद हा मुळापासून तयार होत असल्याने इतर फळांपेक्षा त्यात जास्त जीवनसत्त्व असते. त्यामुळे जंगलातील अनेक प्राणी मुख्यत: कंदावर जगतात. मानवी जीवनाची सुरुवातही पूर्वीपासून कंदावरच होती. त्यामुळे कांदा हा जीवनातील आहाराचा एक मुख्य भाग आहे. त्यात कांदे अनेक प्रकारचे असतात. अनेक औषधी गुणधर्म तसेच जीवनसत्त्व व खनिजामुळे कांदा पौष्टीक व गुणकारी असून ते चांगले अन्न म्हणून प्रचलित आहे. त्यामुळे जगात सर्वत्र प्रचलित असलेल्या या कांद्याला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. मराठीमध्ये प्रामुख्याने या कांद्याला कचरकांदा किंवा केसाळ कांदा असे म्हणतात. कांदा हे अ‍ॅलीक्सी कुळात मोडणारे व अ‍ॅलिअम वंशात जन्माला आलेले नैसर्गिक पीक आहे. कचरकांदा अनेक लोकांना माहित आहे. परंतु त्याच्या उत्पत्तीबाबत सर्वच लोक अनभिज्ञ आहेत. कचर कांद्यावर आजपर्यंत कोणतेही संशोधन करण्यात न आल्याने पुस्तकी भाषेत किंवा शासनाकडे याची कुठेही नोंद नाही. परंतु या कचरकांद्याला भरपूर मागणी आहे. आज लोकसंख्येच्या तुलनेने हा कांदा अपुरा पडत असल्याने या कांद्यावर संशोधण होणे गरजेचे आहे. भारतात हा कांदा सर्वत्र आढळत असून पौष्टीकतेबाबत व उपयुक्ततेबाबत लोकजागृती नसल्याने हा कांदा उपेक्षीत आहे. परंतु या कांद्याच्या भरवश्यावर महाराष्ट्रातील अनेक कुटुंब शेती व्यवसायासोबत जोडधंदा म्हणून करीत आहेत. या कांद्याला मानवी जीवनात महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषी विभागाने याकडे विशेष लक्ष दिल्यास हा कांदा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जोडधंदा म्हणून उदयास येवू शकतो. ज्याप्रमाणे शिंगाडा या पिकाने शेती व्यवसायात आपले स्थान निर्माण केले, त्याचप्रमाणे कचर कांद्याची शासनाने दखल घेतल्यास शिंगाडा उत्पादनातून ज्याप्रमाणे लोकांना रोजगाराची संधी निर्माण झाली तिच संधी या व्यवसायात मिळू शकते.निसर्गाने पृथ्वीवरील प्रत्येक सजीव वनस्पतीला विशिष्ट ओळख दिली आहे. परंतु कचरकांदा या पिकाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास व जनजागृती न झाल्याने ते दुर्लक्षीत पीक ठरले आहे. वास्तविक या कांद्याच्या उपयुक्ततेबाबत नव्याने कृषी क्षेत्रात जोडधंदा पीक म्हणून नोंदणी झाल्यास एकूण लोकसंख्येच्या काही प्रमाणात लोकांना हा कांदा रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. कृषी विभाग हा देशाच्या विकासाचा महत्त्वाचा भाग म्हणून शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करीत असतो. दूरदर्शन, रेडीओ, वृत्तपत्र, नियमकालिके, मासिके, साप्ताहिके, कृषी संचालय, कृषी विद्यापीठे आदी प्रसार माध्यमातून कचरकांदा वगळता इतर पिकांबाबत पुरेशी माहिती पुरविली जाते. ेपरंतु आजही कचरकांदा या सर्व बाबींपासून दूर आहे. (तालुका प्रतिनिधी)भारत कृषी प्रधान देश आहे. भारतात कचरकांद्याची निर्मिती नैसर्गिकरित्या होत असल्याने संशोधनाने कचरकांद्याच्या लागवडीचे तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक आहे. तसेच शासनस्तरावर या कांद्यातील अन्नघटकाबाबत सखोल परीक्षण करून त्याच्या उपयोगितेबाबत जनजागृती करून कचरकांद्याला स्वत:चे अस्तित्व निर्माण करून देणे गरजेचे आहे. याबाबत संपूर्ण माहितीचे संकलन करून शासनस्तरावर मागील एक वर्षापूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.- धम्मा के. निमगडेकचरकांदा संकलनकर्ता, पोंभूर्णा