तंमुस अध्यक्षाच्या नावापुढे न्यायमूर्तीपदाचे बिरूद
By Admin | Updated: June 14, 2015 02:11 IST2015-06-14T02:11:37+5:302015-06-14T02:11:37+5:30
चिमूर तालुक्यातील भीसी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष गोपीनाथ ठोंबरे यांच्या नावापुढे न्यायमूर्ती हा शब्द लावण्याचा मोह महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तंमुस अध्यक्षाच्या नावापुढे न्यायमूर्तीपदाचे बिरूद
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील भीसी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष गोपीनाथ ठोंबरे यांच्या नावापुढे न्यायमूर्ती हा शब्द लावण्याचा मोह महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भीसी येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांनी समितीच्या पुढाकारात गावामध्ये पशु चिकीत्सा व रोगनिदान शिबिराचेआयोजन केले होते. त्यासाठी काही वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रकाशित करून त्याम आपल्या नावापुढे ‘न्यायमूर्ती’ अशा शब्दाचा वापर केला होता. या कार्यक्रमासाठी पत्रिकाही भापण्यात आल्या होत्या.
या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले होते. त्यात भांगडियांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष या नात्याने ठोंबरे यांचा सत्कारही केला होता.
दरम्यान, स्वत:च्या नावापुढे न्यायमूर्ती शब्दाचा वापर केल्याबद्दल चिमूर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद शर्मा यांनी आक्षेप घेवून या प्रकरणी चिमूर पोलिसात तक्रार दाखल केली. या संदर्भात चिमूरचे ठाणेदार मनिष ठाकरे यांच्याकडे विचारणा केली असता, तक्रार दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या हे प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले असून त्यानंतर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)