ज्युनिअर जेसी विंगचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST2021-03-24T04:26:07+5:302021-03-24T04:26:07+5:30
चंद्रपूर : १४ ते १८ वयोगटांतील मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, सामाजिक चळवळीत सहभाग वाढावा या दृष्टीने जेसीआयद्वारे स्थापित केलेल्या ...

ज्युनिअर जेसी विंगचा पदग्रहण सोहळा
चंद्रपूर : १४ ते १८ वयोगटांतील मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, सामाजिक चळवळीत सहभाग वाढावा या दृष्टीने जेसीआयद्वारे स्थापित केलेल्या ज्युनिअर जेसी विंग, जेसीआय आरबिटचा पदग्रहण सोहळा चंद्रपुरात रविवारी पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जेसीआयचे माजी अध्यक्ष मनीष तिवारी, प्रमुख वक्ता म्हणून ॲड. दीपक चटप, ज्युनिअर जेसीच्या अध्यक्ष गौरी मार्कंडेवार, सिचव यश मुथा, ज्युनिअर जेसीचे समन्वय विद्या दिवसे, जेसीआय आरबिट अध्यक्ष हितेश नथवाणी, सचिव विक्रम अरोरा आदी उपस्थित होते. यावेळी ज्युनिअर जेसीच्या अध्यक्ष गौरी मार्कंडेवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना शपथ दिली. तसेच वर्षभरातील कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. ॲड. दीपक चटप यांनी विद्यार्थी जीवनातूनच व्यक्तिमत्व विकास हा भावी आयुष्याचा पाया कसा रचतो, यावर प्रकाश टाकला. मनिष तिवारी यांनी ज्युनिअर जेसी विंगच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी जेसीआय आरबिटचे अध्यक्ष हितेश नथवानी यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन सेजल सिंग, श्रेयश बॅनर्जी, तर आभार सचिव यश मुथा यांनी मानले. यशस्वीतेसाठी परी भगत, अक्षता चरडे, गौरव दिवसे, शेजमिन चरण्या, गौरव मार्कंडेवार, श्रवण, चरडे, अमन कावडे, धृव गौरकार, गौरव रेगुंडवार, साहिल उमाटे, निकिता प्रसाद, अमेय येरणे, जेसीआय आरबिटचे हरिष मुथा, विनोद एडलावार, प्रवीण हलकरे, आनंद गुप्ता, नंदू किरणापुरे, अजय गुप्ता, नंदू किरणापुरे, अमित पडगेलवार आदींनी प्रयत्न केले.