पत्रकारांनी निर्भयपणे लिखाण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:11 IST2018-01-07T00:11:07+5:302018-01-07T00:11:30+5:30

विधिमंडळ, न्यायपालिका आणि प्रशासन या तिन्ही स्तभांना टिकवून ठेवण्यासाठी पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाने निर्भयपणे लिखाण करावे.

Journalists should write fearlessly | पत्रकारांनी निर्भयपणे लिखाण करावे

पत्रकारांनी निर्भयपणे लिखाण करावे

ठळक मुद्देनाना पटोले : चंद्रपुरात पत्रकार दिनाचा कार्यक्रम

चंद्रपूर : विधिमंडळ, न्यायपालिका आणि प्रशासन या तिन्ही स्तभांना टिकवून ठेवण्यासाठी पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाने निर्भयपणे लिखाण करावे. पत्रकारांनी समाजाचा खरा चेहरा शासनापुढे मांडावा. पत्रकारांनी पत्रकारितेची ताकद कदापि कमी होऊ देवू नये, असे मत भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले. चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी स्थानिक मराठी पत्रकार भवनात पार पडलेल्या पत्रकार दिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षपदी चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडू लडके, तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य चेतन भैरम, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, परिषद प्रतिनिधी बबन बांगडे, मुरली मनोहर व्यास, अ‍ॅड. एकनाथ साळवे, माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, श्रीपाद जोशी, अंबिका दवे आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ पत्रकार सुनील देशपांडे यांना बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार, समाजसेवक रामभाऊ वैरागडे यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, सत्यनारायण तिवारी यांना सेवावृत्ती पुरस्कार, राजुराचे प्रेस फोटोग्राफर अविनाश दोरखंडे यांना स्मृती पुरस्कार इरफान शेख यांना झेप गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तर पत्रकारांसाठी आयोजित विविध स्पर्धेचे वितरण करण्यात आले. यावेळी अनिल पाटील यांना शोधवार्ता पुरस्कार, ग.म. शेख यांना पर्यावरण पुरस्कार, पिंपळगाव ब्रह्मपुरीचे रवि शेंडे यांना शैक्षणिक संस्था विकास वार्ता पुरस्कार देवून पुरस्कृत करण्यात आले.
संचालन मोरेश्वर राखुंडे प्रास्ताविक विनोदसिंह ठाकूर तर उपस्थिताचे आभार सुनील तिवारी यांनी मानले. यावेळी बहुसंख्य पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Journalists should write fearlessly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.