पत्रकार दिनानिमित्त व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:28+5:302021-01-13T05:13:28+5:30
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अहेतेशाम अली होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते, ज्येष्ठ पत्रकार ...

पत्रकार दिनानिमित्त व्याख्यान
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अहेतेशाम अली होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार सरिता कौशिक, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते, ज्येष्ठ पत्रकार तथा माजी नगराध्यक्ष विलास टिपले, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सागर वझे, पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे, निलेश डाहाट व सारंग पांडे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सरिता कौशिक म्हणाल्या, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे वाढते प्राबल्य आणि पोर्टलची संख्या वाढत असली तरीही वृत्तपत्रांची विश्वासार्हता कायम आहे. नितीन मते यांनी, वृत्तपत्राच्या बातमीने एखाद्याला न्याय कसा मिळतो हे उदाहरण देऊन सांगितले.
यावेळी लोकमान्य कला अकादमी वरोराची स्नेहल शिरसाठ आणि सई पारखी या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. नक्षलग्रस्त भागात चांगले कर्तव्य बजावले यासाठी शासनाचे विशेष सेवा पदक पुरस्कार जाहीर झालेले पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रामीण भागातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला. यात खांबाडा येथील अविनाश बंन, टेमुर्डा येथील अशोक घाडगे, आनंदवनचे बालकदास मोटघरे, माजरी येथील रवी भोगे आणि शेगावचे मनोज गाठले या वार्ताहरांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ प्रशांत खुळे यांनी केले. आभार चेतन लुतडे यांनी मानले. यावेळी प्रवीण खिरटकर, श्याम ठेंगडी, सारथी ठाकूर आदी उपस्थित होते.