छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिजाऊ जन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:22 IST2021-01-14T04:22:53+5:302021-01-14T04:22:53+5:30

चंद्रपूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश मालेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिजाऊ जन्मोत्सव ...

Jijau Janmotsav at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk | छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिजाऊ जन्मोत्सव

छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिजाऊ जन्मोत्सव

चंद्रपूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश मालेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेला मालार्पण करून झाली. यावेळी प्रा. सतीश मालेकर यांनी अभिवादन केले. सिनेअभिनेता अक्षय लोणारे यांनी जिजाऊ जन्मोत्सव गावागावात, चौकाचौकात आणि घराघरात व्हायला हवा. त्याचप्रमाणे आपल्या मुलांना महापुरुषांची माहिती लहानपणापासून देण्याचे आवाहन केले.

यावेळी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्रलय मशाखेत्री, काव्यलेखन स्पर्धेत युवाकवी-लेखक सुरज दहागावकर, गॉड पॉवर जिमचे संचालक खेमराज हिवसे, पॉवरलिफ्टिंग व बॉडी बिल्डर स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट साहिल जुमडे, सायकल मार्च योद्धे प्रा. अनिल डहाके, शंकर मसराम, सिनेअभिनेता अक्षय लोणारे, ओबीसी समन्वय गौरव पिंपळशेंडे आणि अमोल मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी राजेश पोलेवार, प्रा. अनिल डहाके, व्हीबीव्हीपीचे जिल्हाध्यक्ष मयूर पाऊणकर, विक्रांत टोंगे, प्रा. महेश बावणे, बाबा भसारकर, विपुल धोटे, सुग्रीव मोरे, गजानन सावलीकर, बंडू मोहितकर, ताराचंद धोपटे, महेश मालेकर, खिल्लारे आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Jijau Janmotsav at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.