गोलबाजार हायमास्ट दिव्यांनी झगमगला
By Admin | Updated: September 13, 2016 00:50 IST2016-09-13T00:50:32+5:302016-09-13T00:50:32+5:30
शहरातील मध्यभागी असलेल्या अतिशय वर्दळीचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या गोलबाजार परिसरामध्ये महानगर ..

गोलबाजार हायमास्ट दिव्यांनी झगमगला
एक कोटीची कामे : महापौरांच्या हस्ते लोकार्पण
चंद्रपूर : शहरातील मध्यभागी असलेल्या अतिशय वर्दळीचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या गोलबाजार परिसरामध्ये महानगर पालिकेने नगरोत्थान योजनाच्या माध्यमातून एक कोटीच्या विकास कामाला मंजुरी दिली होती. या विकास कामाचे लोकार्पण महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर वसंता देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, महिला व बालकल्याण सभापती ऐस्तार शिरवार, बाजार प्रभागाचे नगरसेवक रामू तिवारी, माजी महापौर संगिता अमृतकर, नगरसेवक धनंजय हूड, नगरसेवक दुर्गेश कोडाम आदी उपस्थित होते.
नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून गोलबाजार परिसरात मंजूर झालेल्या एक कोटी रुपयांची विविध कामे करण्यात आली. दोन हायमास्ट, ३० पथदिवे व ७५ लाखांच्या रस्त्यांचे काम करण्यात आले.
या विकास कामांमुळे अतिशय वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण झाली आहे. प्रसंगी गोलबाजारातील प्रतिष्ठित व्यवसायिक लक्ष्मीकांत मामीडवार, खुशालबाबू भलगट, मनीष पटेल, अशोक आक्केवार, सतीश पतरंगे, अतिक पतरंगे, मीनल शर्मा, अनुप कपूर, सुहास कोतपल्लीवार, अल्ताफ हुसैन, जुजर अली, दिवाकर बनकर, विशाल आक्केवार, संतोष दिकोंडावार, विजय उमाटे, गिरीश आंबटकर व वार्डातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)