घरी झोपायला ठेवलेल्यानेच केले दागिने लंपास
By Admin | Updated: April 10, 2016 00:44 IST2016-04-10T00:44:44+5:302016-04-10T00:44:44+5:30
पत्नीसह पती बाहेरगावी गेल्याने एका परिचित व्यक्तीस घरी झोपावयास सांगितले. झोपावयास गेलेल्या इसमाने घरातील कपाटात ठेवलेले ४५ हजार रुपये किमतीचे सोने पळविले.

घरी झोपायला ठेवलेल्यानेच केले दागिने लंपास
वरोरा : पत्नीसह पती बाहेरगावी गेल्याने एका परिचित व्यक्तीस घरी झोपावयास सांगितले. झोपावयास गेलेल्या इसमाने घरातील कपाटात ठेवलेले ४५ हजार रुपये किमतीचे सोने पळविले. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली. वरोरा पोलिसांच्या डीबी पथकाने त्या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४५ हजार रुपये किमतीचे सोने जप्त करून त्याला अटक केली आहे.
वरोरा शहरातील कर्मवीर वॉर्डातील पांडुरंग कवडु मेश्राम हे पत्नीसह बाहेरगावी गेले असल्याने घरात अनमोल वसंत नैताम यास घरी झोपावयास सांगितले. त्याने घरात ठेवलेली चावी शोधून लोखंडी कपाट उघडून कपाटातील ४५ हजार रुपये किमतीचे सोने लंपास केले. याबाबत वरोरा पोलिसात तक्रार करण्यात आली. या तक्रारीवरून वरोरा पोलिसांच्या डीबी पथकाने अनमोल नैताम यास ताब्यात घेवून कसून चौकशी केली. तेव्हा त्याने ४५ हजार रुपये किमतीचे चोरलेले सोने परत केले. (तालुका प्रतिनिधी)