शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या लग्नासाठी घेतलेले दागिने लंपास, वेकोलि अधिकाऱ्याच्या घरी धाडसी चोरी

By परिमल डोहणे | Updated: September 13, 2022 21:07 IST

मुलीच्या लग्नासाठी खरेदी केले होते दागिने.

चंद्रपूर : घरी सर्वजण झोपले असतानाही चोरट्यांनी खिडकीचे ग्रील काढून घरात प्रवेश केला. आलमारीचे कुलूप फोडून सोन्याचा हार, चांदीचे ५० शिक्के व रोकड असा तीन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असल्याची घटना चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथील वेकोलि वसाहतीमध्ये सोमवारी घडली. वेकोलि अधिकारी आर. के. प्रसाद यांनी ते दागिने मुलीच्या लग्नासाठी खरेदी केले होते.

वेकोलिचे अधिकारी आर. के. प्रसाद हे नांदगाव पोडे येथील वेकोलि वसाहतीमध्ये वास्तव्यास आहेत. त्याच्या मुलीचे लग्न जुळले आहे. त्यामुळे लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी त्यांनी ५० चांदीचे शिक्के तयार केले होते. सोमवारी रात्री ते झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रील काढून घरात प्रवेश केला. त्यानंतर आलमारीचे लॉक फोडून आलमारीतील सोन्याचा हार, चांदीचे ५० शिक्के व रोकड असा तीन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. अशी तक्रार आर. के. प्रसाद यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये केली.

दरम्यान, ठाणेदार सुधाकर अभोरे, सहायक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्यासह डीबी पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा करून अज्ञात आरोपीवर कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी