बल्लारपुरात नळ ग्राहकांना पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्राधिकरणची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:28 IST2021-05-12T04:28:59+5:302021-05-12T04:28:59+5:30

बल्लारपूर : डेपो विभागातील अनेक प्रभागात काही महिन्यापासून नळाचे पाणी ग्राहकांना पोहचत नाही. अशा नळ ग्राहकांच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र ...

Jeevan Pradhikaran struggles to supply water to tap customers in Ballarpur | बल्लारपुरात नळ ग्राहकांना पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्राधिकरणची धडपड

बल्लारपुरात नळ ग्राहकांना पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्राधिकरणची धडपड

बल्लारपूर : डेपो विभागातील अनेक प्रभागात काही महिन्यापासून नळाचे पाणी ग्राहकांना पोहचत नाही. अशा नळ ग्राहकांच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पाईपलाईनची पाहणी करून त्या दुरुस्त करणे सुरू केले आहे.

डेपो विभागात नळाला पाणी येत नाही, अशी तक्रार नळ ग्राहकांनी माजी नगर सेवक प्रभाकर मुरकुटे यांचे नेतृत्वात मजीप्रा कार्यालयात केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन मजीप्राचे उप विभागीय अभियंता सुशील पाटील यांनी पाईपलाईनची पाहणी करून जिथे पाईप नादुरुस्त आहेत अशा ठिकाणी खोदून ब्लॉकेज दूर करणे सुरू केले आहे. ज्या ठिकाणी ग्राहकांना पाणी मिळत नाही त्यावर तोडगा काढणे सुरू केले आहे. नळ ग्राहकांची पाणी न मिळण्याची समस्या दूर होईल, असे आश्वासन उप विभागीय अभियंता सुशील पाटील यांनी दिले आहे.

Web Title: Jeevan Pradhikaran struggles to supply water to tap customers in Ballarpur