जागेश सोनडुले आंतरराष्ट्रीय परिषदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2017 00:28 IST2017-06-14T00:28:55+5:302017-06-14T00:28:55+5:30
येथील कामगार नेते जागेश सोनडुले यांना कॅनडा येथील स्टील वर्क्स ह्युमिनिटी या जागतिक संस्थेतर्फे किम्बरली, कॅनडा येथे आयोजित अभ्यास सत्रासाठी पाचारण करण्यात आले आहे.

जागेश सोनडुले आंतरराष्ट्रीय परिषदेत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: येथील कामगार नेते जागेश सोनडुले यांना कॅनडा येथील स्टील वर्क्स ह्युमिनिटी या जागतिक संस्थेतर्फे किम्बरली, कॅनडा येथे आयोजित अभ्यास सत्रासाठी पाचारण करण्यात आले आहे. या परिषदेत सस्कातचेवन, मनिटोबा, अल्बर्टा व ब्रिटिश कोलंबियातील सभासद भाग घेतील. या सत्रात प्रामुख्याने आरोग्य, सुरक्षा, संयुक्त, विचारविनिमय, कुशल लवाद पध्दतीवर मार्गदर्शन व संवाद साधून अनुभवाचे आदानप्रदान केले जाईल.
सोनडुले महाराष्ट्र बिल्डींग कन्स्ट्रक्शन फॉरेस्ट अँड वुड या राज्यस्तरीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष असून, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वन व बांधकाम मजुरांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत आहेत.